घरमहाराष्ट्रमहापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा; संभाजीराजे आक्रमक

महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा; संभाजीराजे आक्रमक

Subscribe

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुरू असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापुरुषांबद्दल बोलण्यासाठी कायदा करायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!

“प्रसाद लाड एकीकडे महाराजांना दैवत मानतो आणि दुसरीकडे महाराजांचा अभ्यास ठेवत नाही. भाजपने अशा लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. तरीही नाही ऐकलं तर यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकललं पाहिजे”, असंही संभाजीराजे म्हणाले.  ‘राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याची पहिली मागणी मी केलेली आहे. जोपर्यंत त्यांना राज्याबाहेर हाकललं जात नाही तोपर्यंत स्वराज्य संघटना लढणार आहे. एवढे सगळे लोक महाराजांबद्दल बोलत असतांना भाजप ठाम भूमिका का घेत नाही. यातून भाजपचा दुटप्पीपणा दिसून येतोय.”

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा आणि आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वक्तव्ये केल्याने ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. मराठा संघटनेकडून अतुल साळवे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेकडूनही निषेध करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही याबाबत अल्टिमेटम दिला असून लवकरच तेही आंदोलनाचे हत्यार उगारणार असल्याचे चिन्ह आहेत.

हेही वाचा – …तर मी दिलगिरी व्यक्त करतो, प्रसाद लाडांकडून माफीनामा नाहीच

प्रसाद लाड काय म्हणाले?

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत प्रसाड बोलत होते. “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला,’ अशी माहिती प्रसाद लाड यांना पुरवली. त्यानंतर, लागलीच त्यांनी आपल्या वाक्याची सारवासारव करत ‘महाराजाचं बालपण रायगडावर म्हणजे कोकणात गेलं,’ असं म्हणाले. ‘रायगडावरच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि तेथून सुरुवात झाली,’ असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – शिवाजी महाराजांची तलवारच भाजपाचं मुंडकं छाटेल, संजय राऊतांचा संताप

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -