घरमहाराष्ट्रSandeep Raut ED : "सध्या राजकीय सुडाचे राजकारण सुरू", राऊतांचा आरोप

Sandeep Raut ED : “सध्या राजकीय सुडाचे राजकारण सुरू”, राऊतांचा आरोप

Subscribe

मी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे, अशी माहिती संदीप राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : सध्या राजकीय सुडाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांनी केला आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची ईडी चौकशी करत आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊतांची आज ईडी चौकशीसाठी आले आहेत. ईडीच्या चौकशीला सहकार्य करेन, अशी प्रतिक्रया संदीप राऊत यांनी दिली आहे. आज कथित बॉडी बॅग प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील ईडी चौकशी सुरू आहे.

संदीप राऊत म्हणाले, “ईडी मला जे प्रश्न विचारले, मी त्यांना सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. हे खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सूडाचे राजकारण सुरू आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने देखील तुमची चौकशी केली आहे. यावर मुंबई पोलीस समाधानी नसल्याचे म्हटले होते. यावर संदीप राऊत म्हणाले, “याबद्दल मला काही कल्पना नाही. मी काही चुकीचे काम केले नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Kishori Pednekar ED Enquiry : ‘आम्ही हिशोब देण्यासाठी तयार’; चौकशीला जाण्याआधी पेडणेकरांची प्रतिक्रिया

आरोपी राजन साळुखे यांच्या खात्यातून तुमच्या खात्यात जे पैशांची देवाण घेवण झाली? त्यांची कागदपत्रे नाही, असे ईडीचे म्हणणे आहे. या प्रश्नावर संदीप राऊत म्हणाले, “कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत कोणी चेक घेत नव्हते. तेव्हा कोणी एग्रीमेंट देखील करत नव्हते. त्यावेळी पैशाला देखील कोणी हात लावत नव्हते. या भयानक परिस्थितीत लोक भुकेली राहत होती आणि लोक मरत होतीत. त्यावेळी शब्दाला महत्त्व होते. तेव्हा आम्ही कागदपत्रे बनवू शकलो नाही. मी कोणतेही पैसे घेण्यास तयार नव्हतो. माझ्या छोट्यासे किचन आहे, त्यावेळी साळुखे माझ्याकडे आले, मला तुमचे किचन मिळेल का असे म्हटले होते. त्यांनी मी त्यांना माझे किचन, कामगार, साहित्य, लाईट, पाणी आणि पॅकिंग मटेरियल वापरले. मी कोरोना काळात पैसे घेत नव्हतो. तरी देखील साळुखेंनी मला पैसे दिले आहेत. त्या पैशातून मी लोकांचा पगार दिला आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -