घरमहाराष्ट्रराऊत, आदित्यची नार्को टेस्ट करावी

राऊत, आदित्यची नार्को टेस्ट करावी

Subscribe

भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडत भाजप, सुशांत सिंह राजपूत कुटुंब, सीबीआय यांच्यावर भाष्य केले होते. त्यानंतर भाजपनेही शिवसेना आणि काँग्रेसवर पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंह राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे? असा सवाल केला आहे.या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद म्हणाले की, सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडले पाहिजे, महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यच नव्हे तर या प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या प्रकरणात मौन सोडले पाहिजे. वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत. सीबीआयने या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहीत असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून हे रहस्य समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनीच का राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मौन सोडावे, असे निखिल आनंद यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -