घरताज्या घडामोडीसिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य

सिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

कुठे चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीचे चाक पुढे जातील

कोरोना काळापासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद आहेत. यामुळे सिनेमागृह मालकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राऊत यांच्यासोबत सिनेमागृह सुरु करण्याच्या मुद्यावर चर्चा केली आहे. यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिनेमागृह सुरु करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हटलं आहे. देशातील इतर राज्यात हॉटेल, विमानसेवा आणि सिनेमागृह सुरु करण्यात आली आहेत. यावर अनेकांचा रोजगार अवलंबून असल्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सिनेमागृह सुरु करण्यात यावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या आजूबाजूंच्या राज्यामध्ये सिनेमागृह सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात नाट्यगृह, सिनेमा गृह सुरु व्हावेत, आता लोकल सुरु झाल्या आहेत. हॉटेल सुरु झाले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर सिनेमागृह सुरु झाले आहेत. एअरलाईन्स सुरु आहेत. रेल्वे, रेस्टॉरंट सुरु आहेत. मुंबई ही फिल्म उद्योगाची जनक आहे. इथेच सर्व ठप्प झाल्यामुळे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या सर्वांच्याच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार सांगेल त्या नियमांचे पालन करुन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विचार करावा अशी विनंती राहील. सिनेमागृहांच्या शिष्टमंडळाने चर्चा झाली. त्यांना सांगितले मुख्यंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

एकमेकांविषयी सन्मान राखला पाहिजे

राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, हा वाद विकोपाला जात नाही. दोघेही महाविकास आघाडीचे नेते आहेत. एकमेकांविषयी सन्मान राखला पाहिजे. सुहास कांदे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. भुजबळसाहेब पालकमंत्री आहेत. ज्येष्ठ आहेत त्यांनी खालच्या सर्व आमदारांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले पाहिजे. जसं पंकज, समीर तसेच सुहास कांदे तरुण मुले आहेत. तरुण मुले आहेत सांभाळून घेतलं पाहिजे. यात कुठे चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीचे चाक पुढे जातील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : OBC Reservation : राज्यपालांची अध्यादेशावर सही, अन् सामना अग्रलेखातूनही राज्यपालांचे आभार

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -