घरमहाराष्ट्रSanjay Raut : "...तर मुख्यमंत्र्यांचा मराठी बाणा दिसेल" रोजगाराच्या मुद्द्यावरून राऊतांनी शिंदेंना...

Sanjay Raut : “…तर मुख्यमंत्र्यांचा मराठी बाणा दिसेल” रोजगाराच्या मुद्द्यावरून राऊतांनी शिंदेंना सुनावले

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी दावोसची गुंतवणूक इथे आणण्याआधी आपल्या शेजारच्या राज्यात जी गुंतवणूक गेली आहे तो त्यांनी परत आणला तर त्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बहुचर्चित असा दावोस दौरा पूर्ण झाला आहे. काल गुरुवारी (ता. 18 जानेवारी) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाले आहेत. दावोसमधील आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी 3 लाख 53 हजार कोटींचे सामंज्य करार केले. तर मागील वर्षीही मुख्यमंत्री या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या करारांपैकी 80 टक्के आता पूर्ण झाले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. या दौऱ्यामुळे राज्यात 2 लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. पण त्यांच्या या माहितीवर आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसची गुंतवणूक इथे आणण्याआधी आपल्या शेजारच्या राज्यात जी गुंतवणूक गेली आहे तो त्यांनी परत आणला तर त्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (Sanjay Raut questioned CM Eknath Shinde on the issue of employment)

हेही वाचा… Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राऊतांची टीका, म्हणाले – “जिथे राजकीय फायदा तिथेच…”

- Advertisement -

आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांवर बोलताा राऊत म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रातून जे प्रकल्प, जे रोजगार गुजरातला गेले आहेत त्याबद्दल आधी बोला. मुख्यमंत्र्यांनी दावोसची गुंतवणूक इथे आणण्याआधी आपल्या शेजारच्या राज्यात जी गुंतवणूक गेली आहे तो त्यांनी परत आणला तर त्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल. अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आपल्या आर्थिक संस्था गुजरातला पळवल्या. मुंबईला आत्ताही ओरबाडणे सुरू आहे. महानंद गुजरातकडे वळवला जात आहे. महानंदची सूत्रे गुजरातच्या हाती देण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि त्यांची गँग दावोसला काय करत होते ते आम्हाला काही करायचे नाही. कितीतरी लाख कोटी वगैरे ते सांगत आहेत. मात्र आमच्या समोर एकच घोटाळा आहे तो म्हणजे 8 हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा. यामुळे जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील उद्योजक आले होते. याच आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी 3 लाख 53 हजार कोटींचे सामंज्य करार केले. तर मागील वर्षीही मुख्यमंत्री या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या करारांपैकी 80 टक्के आता पूर्ण झाले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. आम्ही सह्या केलेले सामंज्यस करार हे कागदावरच राहिलेले नाहीत. आता 3 लाख 53 हजार कोटींचे MoU आम्ही केले आहेत. दोन लाख रोजगार निर्मिती यामधून होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -