घरमहाराष्ट्रSanjay Raut : राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे, संजय राऊतांचा कोणावर निशाणा?

Sanjay Raut : राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे, संजय राऊतांचा कोणावर निशाणा?

Subscribe

राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे जे दिसत आहेत, त्यांना आव्हान देण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आजचा मुहूर्त आम्ही निवडला, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई : सांगली आणि भिंवडी लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये वाद कायम आहे. असे असतानाही महाविकास आघाडीच्यावतीने आज, मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषद आयोजित बोलावली आहे. याबद्दलची माहिती देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा मुहूर्त का निवडला, ते सांगितले. (Sanjay Raut: Sanjay Raut’s criticism of Shinde Fadnavis, Ajit Pawar and other leaders)

महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सांगली, भिवंडीवर दावा ठोकला होता. मात्र, शिवसेनेने सांगलीत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडी मतदारसंघात आपला उमेदवार घोषित करून काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसने सांगली मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेना तेथून आपला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाक्-युद्ध रंगले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group : ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत एकजूट कायम आहे. आघाडी असो की युती असो एखाद्या जागेबद्दल शेवटपर्यंत चर्चा सुरूच असते. हुकूमशाही विरुद्ध लढताना, काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काहींचा त्याग करावा लागतो. पण आमच्यात कोणताही वाद उरलेला नाही आणि त्यामुळेच आम्ही एकत्र येत आहोत. राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे जे दिसत आहेत, त्यांना आव्हान देण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आजचा मुहूर्त आम्ही निवडला, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. हा अर्धा शहाणा कोण असे विचारले असता, खासदार संजय राऊत हसले आणि म्हणाले, आज गुढी पाडवा आहे, तर त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशासाठी उडवायची? त्याचे नाव तुम्हाला उद्याच सांगेन. पण हे सरकार आणि महाराष्ट्रातील त्यांचे सर्व लोक हे साडेतीन शहाणेच आहेत, पूर्ण शहाणे नाहीत. साडेतीन शहाण्यांनीच महाराष्ट्र राज्य बुडवले होते.

- Advertisement -

महाविकास आघाडी 35हून अधिक जागा जिंकेल, असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला. काही जण राज्यातील 48पैकी 48, कधी 45हून अधिक जागा जिंकण्याच्या वल्गना करीत आहेत. मात्र आम्ही अशा कोणत्याही वल्गना करणार नाही. 35 पेक्षा जास्त जागा जिंकू, कदाचित त्या 40सुद्धा असतील, अशी पुस्ती त्यांनी जोडली. महायुतीने राज्यात 45पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे, हे उल्लेखनीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -