घरदेश-विदेशThackeray group : ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत..., ठाकरे गटाचे...

Thackeray group : ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

Subscribe

गुढीपाडवा हा ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ असे म्हणत नावीन्याचा ध्यास घेत आनंदाची गुढी उभारणारा हा सण आहे. नवीन वर्षात हिंदुस्थानातील तमाम जनतेने समग्र देशवासीयांच्या आयुष्यात सुखाची गुढी उभारण्याचा संकल्प करायला हवा. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता देशवासीयांनीच सजग राहून त्वेषाने आणि एकजुटीने या असुरी महाशक्तीचा निःपात करायला हवा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांत आलेल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने देशातील लोकशाहीची गुढीच मोडून-तोडून टाकली. केवळ दोन-चार उद्योगपती मित्रांच्या घरांवर ऐश्वर्याची उधळण आणि त्यांच्याच बंगले-महालांवर सोन्याच्या गुढ्या उभारल्या जात आहेत. सत्ता तसेच संपत्तीचा दर्प आणि त्या माध्यमातून बळावलेली ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत प्रत्यक्षात मात्र रावण- राज्याचाच वरवंटा फिरवत देशाच्या संविधानाची शकले करू पाहात आहे, असे जोरदार टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर सोडले आहे. (Gudi Padwa 2024: Thackeray group’s determination to defeat the BJP and raise the gudi of victory)

आज, मंगळवारी गुढीपाडवा आहे. मराठी पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होते. ब्रह्मदेवाने समग्र विश्वाची, सृष्टीची, सप्तलोकांची निर्मिती केल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा सूर्य उगवला वा सूर्याची किरणे प्रथमच पृथ्वीवर पडली, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. सृष्टीचा जन्मदिवस म्हणून नवनिर्मितीसाठी वा कुठल्याही नवीन संकल्पासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वोत्कृष्ट मानला जातो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Gudi Padwa 2024 : आडवा येईल, त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करू – मुख्यमंत्री शिंदे

या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. गेल्या काही वर्षांत आलेल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने देशातील लोकशाहीची गुढीच मोडून-तोडून टाकली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना कटकारस्थाने रचून तुरुंगात डांबले जात आहे. सरकारी यंत्रणांचा अमर्याद गैरवापर करून विरोधकांची राज्य सरकारे फोडली जात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना ब्लॅकमेल करून सरकारपक्षाकडे वळवले जात आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : …कारण माझ्याकडे पैसे नाहीत, पंकजा मुंडेंकडून प्रचार सभेत कार्यकर्त्यांना अनोखे आवाहन

गुढीपाडवा हा ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ असे म्हणत नावीन्याचा ध्यास घेत आनंदाची गुढी उभारणारा हा सण आहे. नवीन वर्षात हिंदुस्थानातील तमाम जनतेने समग्र देशवासीयांच्या आयुष्यात सुखाची गुढी उभारण्याचा संकल्प करायला हवा. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता देशवासीयांनीच सजग राहून त्वेषाने आणि एकजुटीने या असुरी महाशक्तीचा निःपात करायला हवा. अघोषित हुकूमशाहीचा वरवंटा फोडून संविधान रक्षणाची, परिवर्तनाची आणि खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारणारी विजयपताका आता फडकवावीच लागेल, असा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला.

हेही वाचा – NCP Vs BJP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -