घरताज्या घडामोडीगोपीनाथ मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना त्यांनाच कळली -...

गोपीनाथ मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना त्यांनाच कळली – संजय राऊत

Subscribe

नक्कीच महाराष्ट्राचे आणि देशाचे सर्वात अनुभवी नेते म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरराव चव्हाण यांच्यानंतर मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्या दोन्ही क्षेत्रामध्ये हा देश आत्मनिर्भर व्हावा. यासाठी संरक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी दोन ठोस पाऊलं पुढे टाकली. तसेच प्रचंड लोकप्रिय आणि जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकीय नेते असून हवेत गप्पा न मारणारे असे शरद पवार हे नेते आहेत. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच ते म्हणाले की,भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे असते तर राज्याचं राजकारण जे आज आहे ते तुम्हाला दिसलं नसतं. शिवसेना आणि भाजपची युती रहावी म्हणून ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भारतीय जनता पक्षामध्ये दिसत नाही

पुढे म्हणाले की, आज गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भारतीय जनता पक्षामध्ये दिसत नाही आणि ज्याच्याशी संवाद साधता येत नाही. ज्याला राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे ज्याला माहिती होतं. असे गोपीनाथ मुंडे होते. त्यांच्यासोबत २५ ते ३० वर्ष जवळून काम केलंय ते सुद्दा लोकप्रिय नेते होते. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाची चळवळ जी तुम्हाला दिसतेय. त्याचे ते प्रणेते आहेत.

आजही राजकारणात पवार हे तितकेच सक्रिय नेते

सध्या या देशातील विरोधी पक्षातील आघाडी एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि राहील. वयाच्या ८१ व्या त्यांनी पदार्पण केलं असून आजही राजकारणात पवार हे तितकेच सक्रिय नेते आहेत. त्यामुळे ते आम्हालाही आणि तरूणांनाही लाजवतील कारण त्यांचं अखंड वाचन आणि चिंतन मी पाहत असतो. महाराष्ट्राने देशाला जे काही नेतृत्त्व दिलेलं आहे यामध्ये शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वोच्च आहेत. महाविकास आघाडीचा एक प्रयोग सुरू आहे. परंतु हा प्रयोग शरद पवार यांच्या सहकार्याशिवाय आणि भूमिकेमुळे शक्य नव्हता. त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत राहो.

- Advertisement -

लहानपणापासून शरद पवार यांच्या व्यक्तीमत्त्वावर मला आदर्श

शरद पवार यांचा वाढदिवस कोरोनाच्या सर्व मर्यादांचं पालन करून होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे हॉलमध्ये सुद्धा केलं जाणार आहे. असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी जुने फोटो ट्विटरवर शेअर करत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अनेक वर्षांपासूनचा तो फोटो आहे. लहानपणापासून शरद पवार यांच्या व्यक्तीमत्त्वावर मला आदर्श होता. महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी आम्हाला शरद पवार यांनी दिली. त्यावेळच्या काळातले आणि संदर्भातले ते फोटो असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

साहित्य, क्रिडा, शेती व उद्योगांमध्ये शरद पवारांचं फार मोठं योगदान

आज सकाळीच मी पवार साहेबांना भेटलो. मला निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरला जायचं होतं. त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अनेक वर्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलेले आहेत. साहित्य, क्रिडा, शेती व उद्योगांमध्ये शरद पवार यांचे फार मोठं योगदान आहे. असं राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

शरद पवार हे एक सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय नेते

शरद पवार हे एक सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय नेते आहेत. देशात जो पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्या सर्व पक्षांना एकत्र करून जो काही पर्याय द्यायला पाहीजे. तो पर्याय देण्याचा प्रयत्न शरद पवार करतील. यामध्ये काही वेळ जाईल परंतु हे सर्वकाही यशस्वी होईल. असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -