घरताज्या घडामोडीसंतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी...

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

Subscribe

कणकवलीमध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील आज सुनावणी करण्यात आली. सरकारी वकिल आणि नितेश राणे यांच्या वकिलांमध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला आहे. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयात सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींबाबतचे फोटो आणि माहिती न्यायालयाला दिली आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात आमदार नितेश राणे देखील सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान नितेश राणे यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी सुरु करण्यात आली आहे. परंतु न्यायालयाच्या वेळे अभावी बुधवारी सुनावणी घेण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे सुनावणी गुरुवारी होणार आहे.

- Advertisement -

सरकारी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब याने आपल्या मोबाईलवरून आरोपी सचिन सातपुतेंना ३३ वेळा केला फोन केला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केला आहे. तसेच आमदार नितेश राणे व माजी जी प अध्यक्ष गोटया सावंत याना कायद्याचा धाक राहीलेला नाही. गोटया सावंत यांच्यावर २५ गुन्हे दाखल असल्याची बाब ही सरकारी वकिलांनी सुनावणी मध्ये समोर आणली नितेश राणे,सचिन सातपुते एकत्र असल्याचे फोटो सरकारी वकील प्रदिप घरत यांनी कोर्टात सादर केले आहेत.

आरोपी शरद ठोकळे, राकेश परब व मनिष दळवी हे तिघे ही एकमेकांच्या संपर्कात होते असेही अॅड. घरत यांनी न्यायालयात सांगितले. घटनेच्या दिवशी तिन्ही आरोपी एकत्र होते असेही सरकारी वकील म्हणाले आहेत. कारवाई झाल्यास अधिक्षक कार्यालया वर मोर्चा काढू हा दबाव नाही का? असा प्रश्न देखील वकिलांनी उपस्थित केला आहे. केंद्रात आमचे सरकार आहे हे लक्षात ठेवा ,ही धमकी नाही का? असा सवाल सरकारी वकील प्रदिप घरत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नितेश असो वा कोणीही असो, राणेंनी पोलिसांना माहिती देणे गरजेचेच, संजय राऊतांचे वक्तव्य

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -