घरताज्या घडामोडीनितेश असो वा कोणीही असो, राणेंनी पोलिसांना माहिती देणे गरजेचेच, संजय राऊतांचे...

नितेश असो वा कोणीही असो, राणेंनी पोलिसांना माहिती देणे गरजेचेच, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

कणकवलीमध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप नेते नितेश राणे सध्या अज्ञात वासात आहेत. नितेश राणे कुठे आहेत ते सांगणार नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. राणेंच्या या वक्तव्यामुळे त्यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. परंतु कायद्यासमोर नितेश राणे कुठे आहेत याबाबत नारायण राणे यांनी पोलिसांना माहिती देणं गरजेचे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नाशिकमध्ये एका आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राऊतांना नितेश राणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, हा एक गृहमंत्रालयासंदर्भातील विषय आहे. पण महाराष्ट्रातील घडामोडीकडे पाहिले तर काल केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद ऐकली. तेव्हा पोलिसांना हवा असलेला संशयित आरोपी हा आमदार, खासदार, मंत्री कोणीही असेल. पोलीस त्यांना हत्येच्या प्रयत्न केल्यामुळे शोधत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणत आहेत ते कुठे आहेत ते मला माहिती आहे पण सांगणार नाही. हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

माहिती लपवल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो

संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री होता. पोलिसांना सहकार्य केले पाहिजे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री, पंतप्रधान असले तरी सहकार्य करणं आपली जबाबदारी आहे. कायद्यापासून पोलिसांपासून कोणतीही माहिती लपवली नाही पाहिजे. पोलिसांना एखादी व्यक्ती हवी असेल गुन्ह्या संदर्भात तर तो आपला पुत्र असेल, मित्र असेल अन्य कोणतीही व्यक्ती असे. तर त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. ती माहिती देणं गरजेचे आहे. माहिती न दिल्यामुळे, माहिती लपवल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असे संजय राऊत म्हणाले आहे.

नोटीस कोणाला पाठवायची हे महाराष्ट्र सरकारच्या कायदा विभागाला कळतं, कायद्याचे पालन कायद्याची अंमलबजावणी याबाबत महाराष्ट्र सरकारला कोणीही अति शहाणपणा शिकवू नये. या राज्याची पंरपरा उत्तम प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करणारी आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  नारायण राणे हाजिर हो, नितेश राणे प्रकरणात राणेंच्या बंगल्यावर चिकटवली पोलिसांनी नोटीस

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -