घरमहाराष्ट्रमुरबाडमधील गावांना स्वयंपूर्णतेचा ध्यास; १४ गावांचा आदर्श पद्धतीने होतोय विकास

मुरबाडमधील गावांना स्वयंपूर्णतेचा ध्यास; १४ गावांचा आदर्श पद्धतीने होतोय विकास

Subscribe

आता हाच पॅटर्न इतर १४ गावांमध्ये राबविला जाणार

राळेगण सिद्धी किंवा हिरवे बाजार या गावांची खूप प्रशंसा होते. देशभरातील पर्यटक ही गावे पाहण्यासाठी येतात. मात्र अद्याप त्यापासून प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणी तशा पद्धतीने ग्रामविकास करण्याचे फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र आता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील १४ गावांमध्ये शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागातून स्वयंपूर्ण खेडी हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेतून तालुक्यातील वडाची वाडी या गावाचा अवघ्या २५ दिवसात कायापालट करण्यात आला.

२५ दिवसात गावात एक चळवळच

वडाची वाडीमध्ये १२५ कुटुंबे राहत असून या वस्तीत योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग कामाला लागले. त्यांना ग्रामस्थांनीही साथ दिली. गेल्या २५ दिवसात गावात एक चळवळच राबविण्यात आली. त्यातून गाव स्वयंपूर्ण झाले.

- Advertisement -

असा झाला कायापालट

गेल्या २५ दिवसात गावातील प्रत्येक घरात शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक घरासमोर शोषखड्डा खोदून पर्जन्यजलसंचयनाची सोय केली. त्यामुळे गावाची भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. विविध चिकित्सा शिबिरे घेऊन गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. गरजू रुग्णांना उपचार देण्यात आले. प्राथमिक शिक्षक, गटविकास अधिकारी यांच्या मदतीने गावकऱ्यांनी प्रत्येक कामात उत्साहाने भाग घेतला.

हा पॅटर्न इतर १४ गावांमध्ये राबविला जाणार

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी या गावाला भेट दिली. आता हाच पॅटर्न इतर १४ गावांमध्ये राबविला जाणार आहे. गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर, प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर यांनी योजना राबविण्यात पुढाकार घेतला.

- Advertisement -

रोजगाराला प्रोत्साहन

गावातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जात आहे. भाजीपाला लागवड, पशूपालन, बुरूडकाम आदींचा त्यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -