घरताज्या घडामोडीअभिनेते विक्रम गोखलेंवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

अभिनेते विक्रम गोखलेंवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

Subscribe

विक्रम गोखलेंवर ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे.

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम गोखलेंसह आणखी तीन जणांचा यात समावेश आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील जमिनीचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून बेकायदा विक्री केल्याचा आरोप गोखलेंवर करण्यात आला आहे.

जयंत प्रभाकर बहिरट यांनी विक्रम गोखलेंवर ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. यानुसार विक्रम गोखले , जयंत म्हाळगी,सुजाता संजय म्हाळगी यांच्यावर पुण्याच्या पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लॉटधारकांची ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ४२०, ४६५ , ४६८ , ४४७ , ४२७ , ३४ या कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

२५ वर्षांपूर्वी जयंत आणि सुजाता म्हाळगी यांनी सुजाता फार्म प्रा. लिमीटेड स्थापना केली. त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या ‘गिरीवन प्रोजेक्ट’या कंपनीचे अभिनेते विक्रम गोखले हे अध्यक्ष होते. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करून प्लॉटधारकांना खोटी माहिती दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे , खरेदी खतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गटासारखा नसणे , दिलेल्या गटापेक्षा दीड किमी लांब पझेशन देणे , खरेदी करताना दाखवलेल्या जागेप्रमाणे जागा न देणे , खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे अशारितीने वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केल्याचा दावा केला आहे.

या बाबत गिरिवन कडून खुलासा करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गिरिवन संस्था गेली ३० वर्षे सुरळीत सुरू आहे. जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांच्या सात बारा उताऱ्यात फरक असल्याचे दिसून आले. जमिनीची मालकी आणि वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत जमिनीच्या मालकासोबत बोलणी सुरू आहे. यात कोणाचीही फसवणूक करण्याचा आमचा हेतू नव्हता. पण मालकांनी याबाबत फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्याचा तपास चालू आहे. गिरीवनची कायदेशीर बाजू आम्ही त्यात मांडणार असल्याचं गिरीवन कडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -