घरताज्या घडामोडी'ई ना चोलबे', तुम्ही परदेशातून येणार, शॉपिंग मॉलमध्ये ५०० जणांना करोना पसरवणार...

‘ई ना चोलबे’, तुम्ही परदेशातून येणार, शॉपिंग मॉलमध्ये ५०० जणांना करोना पसरवणार – ममता बॅनर्जी

Subscribe

तुम्ही खूपच बेजबाबदार वागलेला आहात. करोना टेस्ट टाळत तुम्ही व्हीआयपी स्टेटसची अपेक्षा करू नका, अशा शब्दातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खडसावले आहे. एका सनदी अधिकाऱ्याचा युकेतून परतलेल्या मुलाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये करोनाचे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. करोनाची लागण झाली असावी म्हणूनच करोनाची चाचणी करण गरजेच आहे अशा शब्दात ममता दीदींनी सनदी अधिकाऱ्याची कानउघडणी केली आहे.

या सनदी अधिकाऱ्याची आई कोलकात्यात गृह विभागात सचिव पदावर पदावर कार्यरत आहे. त्यांचे कार्यालय हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच त्याच माळ्यावर आहे. त्यांनी शासकीय बैठकांनाही हजेरी लावली आहे. महत्वाच म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाची चाचणी आता पॉझिटीव्ह आली आहे. स्वतः वडिल डॉक्टर असूनही असा प्रकार घडला आहे. करोना चाचणीनंतर घरातील इतर सदस्य आणि ड्रायव्हर यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. आपल्या मुलाला करोना झाल्याने त्या सनदी अधिकाऱ्यांने आता शासकीय बैठकांनाही येणे टाळले आहे.

- Advertisement -

मी येणाऱ्याचे स्वागतच करते, पण मी करोना घेऊन येणाऱ्याच स्वागत करणार नाही, मला माफ करा अशा शब्दातच ममता बॅनर्जी यांनी सनदी अधिकाऱ्याला बोल सुनावले आहेत. तुम्ही परदेशातून भारतात येऊन लगेचच शॉपिंग मॉल्स यासारख्या ठिकाणी जावू शकत नाही. त्यानंतर तुम्ही चाचणीही करणार नाही, मग ५०० जण तुमच्यामुळे करोनाबाधीत होणार. तुमच कुटुंबाचे स्टेटस वजनदार आहे म्हणून, मी हे खपवून घेणार नाही अशा शब्दातच ममता बॅनर्जी यांनी सनदी अधिकाऱ्याची कानउघडणी केली आहे.

या सनदी अधिकाऱ्याचा मुलगा इंग्लंडमधील एका नामंवत विद्यापिठात शिकण्यासाठी आहे. एअरपोर्टवरून आल्यानंतर त्याला करोनाची स्क्रिनिंग केल्यानंतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. एअरपोर्टवरून तो ड्रायव्हरसह घरी आला. पण घरी आल्यानंतर मात्र त्याला करोनाची लक्षणे आढळली आहेत. आता हा मुलगा करोना चाचणीनंतर पॉझिटीव्ह आढळला आहे. त्याच्या घरात पालकांसह दोन घरकाम करणाऱ्यांचा समावेश आहे. आता या मुलाला एका विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -