घरमहाराष्ट्रएसटीतील महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबणार, स्वच्छ आगारासाठी कार्यक्रम जाहीर

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबणार, स्वच्छ आगारासाठी कार्यक्रम जाहीर

Subscribe

काही आगार बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (POP) तत्वावर विकसित करण्यात येत आहे. या आगारांवरही महामंडळाचीच मालकी असणार आहे. मात्र, पीओपी तत्वावर विकसित करण्यात येतील, असं देसाई म्हणाले.

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून एसटी आगारांची दूरवस्था सातत्याने चर्चेत येत आहे. तसंच, महिला कर्मचाऱ्यांची या आगारांमध्ये गैरसोय होत असल्याच्याही समस्या समोर येत आहेत. यावरून आज विधान परिषदेत आमदार प्रज्ञा सातव यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी एसटी आगारांची स्वच्छता आणि महिलांच्या विश्रामगृहाबाबत आश्वस्त केले आहे. त्यामुळे लवकरच एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची कुंचबणा थांबण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – सफाई कर्मचाऱ्यांच्या वारशांसाठी गुड न्यूज, शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार नोकरी

- Advertisement -

एसटी आगाराच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची असते. जिथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तिथे कंत्राटदार नेमून स्वच्छता केली जाते. कोविडच्या काळात काही आगार वापरात नसल्याने तेथील स्वच्छतागृह आणि विश्रामगृहांची दूरवस्था झाली. परंतु, कोविड काळानंतर स्वच्छतागृह आणि विश्रामगृह सुस्थितीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, आगारातील स्वच्छतागृह आणि विश्रामगृहात सरप्राइज व्हिजिट देण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

आगार स्वच्छ राहण्याकरता तीन उत्कृष्ट स्वच्छ आगारांना प्रोत्साहन बक्षिसही देण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकाला ५० लाख, दुसऱ्या २५ लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या स्वच्छ आगाराला १० लाखांचे प्रोत्साहन बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणाही आज शंभूराज देसाई यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – शाळेतील लैंगिक अत्याचाराचे पडसाद विधान परिषदेत, सायबर प्रोजेक्टबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

काही आगार बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (POP) तत्वावर विकसित करण्यात येत आहे. या आगारांवरही महामंडळाचीच मालकी असणार आहे. मात्र, पीओपी तत्वावर विकसित करण्यात येतील, असं देसाई म्हणाले.

महिला कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृह आणि स्वच्छतागृहांबाबतच्या प्रश्नावरही शंभूराज देसाई यांनी प्रज्ञा सातव यांना आश्वस्त केले. महिला कर्मचाऱ्यांची कुंचबना थांबवण्यासाठी आज मोठी घोषणा केली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मिळालेल्या देखभाल दुरुस्तीच्या निधीतून महिलांचे विश्रांतीगृह आणि स्वच्छतागृह प्राधान्याने सुस्थितीत करण्याचे सुधारित आदेश आजच निर्गमित केले जातील, असं शंभूराज देसाई म्हणाले.

प्रवीण दरेकरही आक्रमक

एसटीचा मुद्दा उपस्थित होताच आमदार प्रवीण दरेकर यांनीही आक्रमक भूमिक मांडली. बैठका आणि समित्या नेमण्यापेक्षा संबंधित कामांसाठी निधींची तरतूद करावी, असं प्रवीण दरेकर म्हणाले. स्वच्छता, देखभाल-दुरुस्तीसाठी तरतूद करून त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. दरम्यान, एसटी संदर्भातील सर्वच मुद्दयांवर बैठक आयोजित करून त्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल, असं शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मविआ आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -