घरमनोरंजन'सर्कस'मधील 'आशिकी' गाण्याला प्रेक्षकांची पसंती; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्यूज

‘सर्कस’मधील ‘आशिकी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्यूज

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आगामी ‘सर्कस’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. येत्या काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘करंट लगा रे’ आणि ‘सुन जरा’ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती यातील ‘करंट लगा रे’ गाण्यामध्ये रणवीरसोबत दीपिका देखील होती. या गाण्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. तर ‘सुन जरा’ गाण्यामध्ये रणवीरची पूजा आणि जॅकलीनसोबची केमिस्ट्री पाहायला मिळाली. दरम्यान, आता या चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘आशिकी’मध्ये रणवीरसोबत पूजा आणि जॅकलीनची केमिस्ट्री

- Advertisement -

नुकत्याच काही वेळापूर्वी सर्कस चित्रपटातील ‘आशिकी’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं. अवघ्या काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या गाण्यामध्ये रणवीरसोबत पूजा आणि जॅकलीन जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. शिवाय ‘सर्कस’मधील इतर कलाकार देखील दिसत आहेत. काही वेळातच या गाण्याला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत.

‘सर्कस’मध्ये दिसणार जुळ्या भावांची गोष्ट
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस चित्रपट विल्यम शेक्सपिअरचे नाटक द कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंह डबल रोलमध्ये दिसणार आहे. रणवीर व्यतिरिक्त वरुण शर्मा देखील या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे.

- Advertisement -

23 डिसेंबर 2022 रोजी होणार चित्रपट प्रदर्शित
सर्कस या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रोहित शेट्टीने केली असून यामध्ये रणवीर सिंह, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीवर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.23 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या ‘गडद अंधार’चा रोमांचक टिझर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -