घरहिवाळी अधिवेशन 2022मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मविआ आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मविआ आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Subscribe

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या (बुधवार) तिसऱ्या दिवशी नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) नियोजन प्राधिकरणाच्या कथित भूखंड वितरण घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपुरातील एनआयटीचा 83 कोटींचा भूखंड विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयांत विकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयानेही एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले आहेत. आपल्याकडून चूक झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा दुरुपयोग करून अनियमितता केल्याने शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी काल केली होती.

- Advertisement -

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला. 2007च्या सरकारने जो घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही केली. ज्यावेळी आम्हाला समजले की, हे प्रकरण न्यायालयात आहे आणि गिलानी समितीचा विषय आहे. त्यावेळी न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे तोही निर्णय घेण्याचे धाडस आम्ही केले. त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल म्हटले होते.

मात्र, विरोधकांनी आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. घेतले खोके भूखंड ओके…, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो…, खोके सरकार हाय हाय…, खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…, भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…, ‘मित्रा’चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…, मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा… या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…, मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या राज्यपालाला हटवा.., ईडी सरकार हाय हाय… स्थगिती सरकार हाय हाय… अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -