घरताज्या घडामोडीम्हणून मी अमित शाहांना भेटलो, खुद्द पवारांकडूनच उलगडा

म्हणून मी अमित शाहांना भेटलो, खुद्द पवारांकडूनच उलगडा

Subscribe

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांना मी भेटलो. माझ्यासोबत दांडेगावर राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, देशाच्या सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दोघेही होते. साखरेच्या संदर्भात केंद्राने जे काही निर्णय घेतले, त्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज होती. ही गोष्टी आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडली. अमित शाह हे जसे केंद्रीय गृहमंत्री जसे आहेत, तसेच ते आता सहकार मंत्रालयाचेही मंत्री आहेत. साखर हा विषय त्यांच्याकडे असल्याने हा विषय त्यांच्याकडे मांडण्याची गरज होती. मी जेव्हा सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी गुजरातमध्ये अनेकदा पाहिले की गुजरातमधील सहकारी संस्थांमध्ये विशेषतः अहमदाबाद कोऑपरेटीव्ह बॅंक यासारख्या संस्थेमध्ये अमित शाह हे संचालक असायचे. सहकारच्या प्रश्नाबाबत ते जागरूक असायचे, म्हणूनच ज्यांना हा विषय कळतो त्यांच्याकडे हा विषय मांडावा ही माझी भूमिका या भेटीमागे होती. याच हेतूने आम्ही तिथे गेलो. माझ्यासोबत आणखी तीन लोक होते असाही खुलासा शरद पवार यांनी केला.

पुणे भेटीवरही खुलासा

अमित शाह हे लवकरच पुण्यातील वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट केंद्राच्या अखत्यारीतील इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. ही संस्था सहकार मंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. मी जेव्हा सहकार मंत्री होतो तेव्हा ही संस्था माझ्या अखत्यारीत होती. या संस्थेला भेट देण्यासाठीच अमित शहा पुण्याला येणार आहेत. त्यावेळी आणखी काही सहकारी संस्थांना भेट द्यायला मला आवडेल असेही शरद पवार म्हणाले. पुण्यातील वसंतदादा पवार इन्स्टिट्यूट ही देशातील उद्योगांचा अभ्यास करते. तिथे तुम्ही वेळ असेल तर येऊ शकता. तुम्हाला वेळ असेल तेव्हा कळवा, असे मी त्यांना सांगितले. त्यावर अवश्य कळवू असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ममता बॅनर्जी – शरद पवार

ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीबाबतचा उलगडा शरद पवार यांनी केला आहे. माझी आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. पण मी त्यांना सांगितले की महाराष्ट्रात जाणार आहे. मुंबईला जाण मला गरजेचे आहे. त्यामुळे मीच कोलकात्याला येईन तेव्हा भेट घेईन असेही शरद पवार यांनी त्या भेटीबाबत स्पष्ट केले. यावेळी मला शक्य नाही, मला मुंबईला जाव लागेल. मी थांबू शकत नाही असेही मी स्पष्ट केले. अशा बातम्या होतच असतात, असेही पवार म्हणाले.


हे ही वाचा – केंद्रानं आरक्षणासाठीची ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे – शरद पवार

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -