घरमहाराष्ट्रशरद पवारांकडे एकही गाडी नाही; रोकड रक्कम ऐकून तर हैराण व्हाल

शरद पवारांकडे एकही गाडी नाही; रोकड रक्कम ऐकून तर हैराण व्हाल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीसाठी आपला अर्ज रोजी सादर केला. यावेळी त्यांनी आपल्या अर्जासोबत संपत्तीबाबतचे शपथपत्र दाखल केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीसाठी आपला अर्ज दि. ११ मार्च रोजी सादर केला. यावेळी त्यांनी आपल्या अर्जासोबत संपत्तीबाबतचे शपथपत्र दाखल केले आहे. शरद पवार यांच्याकडे एकूण ३२ कोटी ७३ लाखांची संपत्ती आहे. मागच्या सहा वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये केवळ ६० लाखांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्याकडे फक्त २९ हजार ५७० रुपये तर पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे २५ हजार ७५० आणि एकत्र कुटुंब म्हणून फक्त १० हजार ३६० रुपयांची रोकड आहे. विशेष म्हणजे शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्याकडे स्वतःच्या मालकिची गाडी नसल्याचेही पवारांनी आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे. शरद पवार यांनी आपल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार ते स्वतः आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ रुपयांची जंगम मालमत्ता आणि ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपयांची स्थावर मालमत्ता अशी एकूण ३२ कोटी ७३ लाखांची संपत्ती आहे.

शेती किती आहे?

शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या नावावर बारामती मधील माळेगाव आणि ढेकळवाडी येथे साडे सहा एकर शेती आहे. या जमिनीची बाजारभावाप्रमाणे ६५ लाख ८१ हजार २०० रुपये एवढी किंमत आहे. प्रतिभा पवार यांच्या नावे ३.९० एकर जमीन असून त्याची किंमत ६५ लाख ८१ हजार ७६० रुपये आहे. तर बिगर शेती जमिनीमध्ये माळेगाव येथे ४.३२ एकर जमीन असून त्याची किंमत ५० लाख ४७ हजार ३२० रुपये आहे. तर पुण्यात २८५० स्क्वेअर फूटचा फ्लॅट असून त्याची किंमत ८८ लाख ६८ हजार ३०० रुपये आहे.

- Advertisement -

बँकेत किती रुपये?

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीडीसीसी बँक आणि फिक्स डिपॉझिट असे मिळून ३ कोटी ३७ लाख १४ हजार ८५१ रुपये आहेत. तर प्रतिभा पवार यांच्या नावाने २ कोटी ५८ लाख ८९ हजार २८० रुपये आहेत. तर दोघांच्या संयुक्त बँक खात्यावर ३ कोटी ४३ लाख ८९ हजार २५८ रुपये आहेत.

एकच ईडीचा गुन्हा दाखल

शरद पवार यांच्यावर आजवर एकच गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये २००७ ते २०११ मध्ये घडलेल्या गैरव्यवहाराबाबत फिर्यादीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप शरद पवार यांच्याविरोधात कुठलाही आरोप निष्पन्न झालेला नाही, असे पत्रच आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष कृती दलाचे पोलीस उप आयुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -