घरताज्या घडामोडीसरकारला महिला धोरणात बदल करण्याची गरज - शरद पवार

सरकारला महिला धोरणात बदल करण्याची गरज – शरद पवार

Subscribe

पुणे : महिलांच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महिलांना आरक्षण देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. त्यावेळी याला खूप विरोध झाला. तरीही महिलासाठी असणारे कायदे आम्ही पास केले. अजूनही महिला धोरणात अनेक बदल करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

वारजे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थेची माहिती घेताना शरद पवार म्हणाले की, आमचं सरकार असताना महिलांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुलींना हिस्सा दिला तर कौंटुबिक वाद होतील असे आमचे लोक सांगायचे पण त्याचा फायदा मी समजून सांगितला आणि महिला आरक्षणाचा कायदा पास झाला, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

लष्करात देखिल आम्ही मुलींना स्थान दिलं. यावेळीही विरोध झाला, मात्र त्याला न जुमनता मी संरक्षण मंत्री असताना निर्णय घेतला आणि आता मुलीही पायलट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मुलींना कमी लेखू नये, असंही पवार म्हणाले.

- Advertisement -

कष्टकरी कुटुंबं, महिला व एकट्या मातांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या अन्नपूर्णा संस्था समूहाला भेट देऊन संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला. कष्टकरी वर्गासाठी स्वस्त लघु कर्ज, लघु विमा प्रकल्प, एकट्या मातांच्या मुलांचे संगोपन व त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती असे असेल स्तुत्य उपक्रम अन्नपूर्णा संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या कार्याला माझ्या शुभेच्छा, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा : Devendra Fadnavis : तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाहीत; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -