घरताज्या घडामोडी'अन् ज्योतिष शाहू महाराजांसमोरच ढसाढसा रडायला लागला', शरद पवारांनी सांगितला कोल्हापूरातील किस्सा

‘अन् ज्योतिष शाहू महाराजांसमोरच ढसाढसा रडायला लागला’, शरद पवारांनी सांगितला कोल्हापूरातील किस्सा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याक्रमात संवाद साधताना ज्योतिष आणि शाहू महाराजांचा एक किस्सा सांगितला. पुढचे भविष्य सांगणारा ज्योतिषी शाहू महाराजांसमोर उभा राहिल्यावर रडायला लागला असे शरद पवार म्हणाले. शरद पवार ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी शरद पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केलं आहे.

मुंबईत ८१ व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरचा एक किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले, कोल्हापूरला शाहू महाराज राजवाड्याच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये राहत होते. त्यांना शेतकऱ्यांमध्ये राहायला आणि त्यांच्यासोबत जेवण करायला आनंद वाटायचा. एक दिवस कोल्हापूरातील सरदार लोक शाहू महाराजांकडे आले. कर्नाटकातून सर्वज्ञान असणारा ज्योतिषी येणार असल्याचे सरदारांनी सांगितले. या ज्योतिषाला भेटण्याचा आग्रह देखील त्यांनी केला परंतु महाराजांनी त्यांचा विश्वास नसल्याचे उत्तर देत नकार दिला. परंतु आग्रहाखातर शाहू महाराज भेटायला तयार झाले.

- Advertisement -

शाहू महाराजांनी ज्योतिषाला दोन दिवसानंतरची भेटीची वेळ दिली. ज्योतिषी २ दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आला. अन महाराजांसमोर उभा राहिल्यावर ज्योतिषी रडायला लागला. शाहू महाराज म्हणाले रडायला काय झाले. ज्योतिषी म्हणाला मी आलो, तुमच्या सैनिकांनी मला पकडले आणि तुरुंगात टाकलं, मारमार मारलं मला दोन वेळचे अन्न देखील दिले नाही. माझे हाल केले.

शाहू महाराज ज्योतिषाला म्हणाले, तु आला माझं ज्योतिष सांगायला पण तुला कळलं नाही की तुझं ज्योतिष काय करणार आहे. मी आधुनिकतेचा विचार करतो अशा भंपक गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मी सुधारणेचा विचार करतो असे महाराजांनी ज्योतिषाला सांगितले. असा भन्नाट किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

- Advertisement -

शरद पवार पुढे म्हणाले की, आपण आंबेडकर, फुले, शाहू यांची नावं घेतो याचे कारण त्यांची दृष्टी आहे. त्यांचा विचार समाजाला १०० वर्षे पुढे नेणारा आहे. या पद्धतीने त्यांनी समाजकारण राजकारण केलं यावरच चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ही भावना ठेऊन आपण विचार केला पाहिजे असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : ‘त्या कवीचे विचार ऐकून आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं’, शरद पवारांकडून आठवणींना उजाळा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -