घरमहाराष्ट्रसुखबीर सिंह बादल यांच्या निर्णयाचं शरद पवारांनी केलं स्वागत

सुखबीर सिंह बादल यांच्या निर्णयाचं शरद पवारांनी केलं स्वागत

Subscribe

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या पंजाबच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. केंद्र सरकारने संसदेत तिन्ही कृषी विधेयकं सादर केल्यानंतर शिरोमणी अकाली दलाने कडाडून विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आता भाजपची साथ सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.

भाजपचा जुना मित्र आणि एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यापूर्वी संसदेत केंद्राने कृषी विधेयकं मांडली होती तेव्हा अकाली दलाने विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिरोमणी अकाली दल मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडत असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, आता एनडीएतून बाहेर पडण्याचाही निर्णय शिरोमणी अकाली दलानं घेतला आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं स्वागत केलं आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी ट्विट करून पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांचं निर्णयाबद्दल अभिनंदन केलं. “कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचं अभिनंदन. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -