घरIPL 2020RR vs KXIP : राजस्थानच्या वादळासमोर पंजाब उध्वस्त

RR vs KXIP : राजस्थानच्या वादळासमोर पंजाब उध्वस्त

Subscribe

राजस्थान रॉयल्सचा दुसरा विजय

शारजाच्या मैदानात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल यांच्यात रविवारी झआलेल्या सामन्यात पुन्हा एकदा षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. स्मिथ (५०), संजू सॅमसन (८५) आणि राहुल तेवातीयाच्या (५३) तडाखेबाज खेळीच्या जोरावर पंजाबला ४ विकेट्सनी पराभूत केलं आहे. पंजाबने दिलेलं २२४ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सहा गड्याच्या मोबदल्यात २२६ धावा करत हा सामना जिंकला. राजस्थानचा हा दुसरा विजय आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने मयंक अग्रवालच्या (१०६) तुफानी शतक आणि केएल राहुलच्या (६९) अर्धशतकी खेळीच्या मदतीने २० षटकांत २ बाद २२३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १९.३ षटकांत संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि राहुल तेवतिया यांच्या अर्धशतकांच्या मदतीने ६ गडी गमावून २२६ धावा तकरत हा सामना ४ गडी राखून जिंकला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी १८३ धावांची सलामी भागिदारी केली. मयंतक अग्रवालने तुफानी खेळी करत आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. अग्रवालने ५० चेंडूत १० चौकार आणि ७ षटकार लगावत १०६ धावा केल्या. टॉम करनने मयांकला माघारी धाडत राजस्थानची पहिली जोडी फोडली. यानंतर कर्णधार केएल राहुल देखील ६९ धावावंर बाद झाला. राहुलने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार लगावला. यानंतर मैदानावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १३ आणि निकोलस पूरनने २५ धावांची खेळी करत नाबाद राहिले. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम करनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना स्मिथ आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. तिसर्‍या षटकात जोस बटलरला बाद करून शेल्टन कॉटरेलने राजस्थानला पहिला धक्का दिला. बटलर ४ धावांवर बाद झाला. बटलर बाद झाल्यानंतर स्मिथने संजू सॅमसनसह राजस्थानचा धावफलक हलता ठेवला.

- Advertisement -

स्मिथने शानदार फलंदाजी करत २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. सॅमसनने सलग दुसर्‍या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसने फटकेबाजी सुरुच ठेवली. सॅमसनने संपूर्ण डावात ४२ चेंडूंचा सामना करत ८५धावा केल्या. या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. संजू सॅमसनला मोहम्मद शमीने केएल राहुलच्या हाती झेलबाद केलं. सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थान हा सामना हरणार असं वाटत असताना राहुल तेवतिया नावाचं वादळ आलं. राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरलच्या एका षटकात ५ षटकार ठोकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -