घरमहाराष्ट्रईडीच्या कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक; संजय राऊतांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर

ईडीच्या कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक; संजय राऊतांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर

Subscribe

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत. पीएमसी बँकेतील एका कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली होती. ईडी प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. मंगळवारी डोंबिवलीमध्ये स्टेशन परिसरात शिवसैनिकानी संजय राऊत यांनी भाजपविरोधात केलेल्या विधानाचे बॅनर झळकावले असून राऊत याना पाठिंबा दर्शवला आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपवर टीकेची तोफ डागली. भाजपच्या कार्यालयात ED चा टेबल टाकला आहे का? भाजपचा पोपट असला तरी मी ED चा आदर करतो. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देशा सोडावा लागेल, अशी विधानं करत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला होता. दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी सोमवारी ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालय, असं पोस्टर लावलं. आज पुन्हा एकदा शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या विधानांचे पोस्टर्स मुंबईत लावली आहेत.

- Advertisement -

मला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही – संजय राऊत

संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी दोन ते चार दिवसांचा वेळ मागणार आहे, असं सांगितलं. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत धमकावलंही जातं असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हटलं होतं. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, मला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि मला धमकावणारा राहणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -