घरक्रीडाIND VS AUS : Adelaide च्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये फक्त सन्नाटा होता...

IND VS AUS : Adelaide च्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये फक्त सन्नाटा होता – रवी शास्त्री

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिल्याच अॅडेलेडच्या सामन्यात अवघ्या ३६ धावांवर सर्व संघ ऑलआऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोणीच काहीच बोलले नाही. त्यानंतर आम्ही मेलबर्न गाठले, आम्ही इतकच ठरवले की आता पुन्हा उभे रहायचे आणि लढायचे. जागतिक पातळीवर किक्रेटच्या इतिहासात हा सर्वाधिक ग्रेटेस्ट कमबॅक करणारा विजय आहे, अशा शब्दातच भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी आजच्या सामन्यातील विजयाचे कौतुक केले. मी आज नक्कीच आनंदी आहे. बॉक्सिंग डे कसोटीमधील विजय हा भारतीय फॅन्ससाठी नव्या वर्षासाठीचे गिफ्ट असल्याचे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

अॅडेलेडमधील अतिशय सुमार कामगिरीनंतर संपुर्ण कठीण काळात आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या लाखो भारतीय चाहत्यांसाठी ही आमच्याकडून एक भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवघ्या ३६ धावांवर ऑल होण्याच्या सुमार कामगिरीपासून ते आजच्या विजयामुळे आता आम्ही मालिकेत बरोबरी केली आहे, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले. पहिल्या कसोटीतीली सुमार कामगिरीनंतर मुख्य कोच म्हणून काम करणाऱ्या रवी शास्त्री यांच्या कामगिरी बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण दुसऱ्या कसोटीतील विजयासाठीचे संपुर्ण श्रेय हे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाला दिले. तसेच भारतीय टीमच्या सदस्यांनी केलेल्या कमबॅकचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

- Advertisement -

 

- Advertisement -

जेव्हा तुम्हा ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरोधात खेळता तेव्हा तुम्हाला पाचही दिवस सातत्याने कामगिरी करायची असते. एक किंवा दोन दिवसाच्या कामगिरीने काहीही होत नाही. महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही अॅडेलेडच्या सामन्यात सपाटून पराभूत होता, त्यामधून कमबॅक करणे हे अधिकच आव्हानाचे असते, असे शास्त्री म्हणाले. भारताने या सामन्यामध्ये दोन नवोदित खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी दिली होती. मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल या दोघांनीही कसोटीत पदार्पण करत आपल्या कामगिरीची चमक पहिल्याच सामन्यात दाखवली. विराट कोहली पॅटर्निटी सुट्टीवर गेल्यावर भारतीय संघात चार मोठे बदल करण्यात आले. स्वतः अजिंक्य रहाणेला अॅडेलेडमध्ये दमदार कामगिरी करता आली नव्हती. पण तरीही तो संघाच्या पाठीशी उभा राहिला आणि विजयाची स्क्रिप्ट लिहिली अशा शब्दात शास्त्री यांनी रहाणेच कौतुक केले. सिराजची कामगिरी ही आऊटस्टॅंडिंग होती, तर गिलनेही ज्या आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने कामगिरी केली हे सगळ अतिशय शिस्तबद्ध होते अशा शब्दात शास्त्री यांनी दोन्ही नवोदित खेळाडूंच्या कामगिरीचे वर्णन केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -