घरमहाराष्ट्रअंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांची माघार; कार्यकर्ते आक्रमक, भाजपविरोधात घोषणाबाजी

अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांची माघार; कार्यकर्ते आक्रमक, भाजपविरोधात घोषणाबाजी

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा होताच अंधेरी परिसरात त्याचे पडसाद उमटू लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेलांच्या निवडणुकीतील माघारीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मात्र मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत निवडणूक कार्यालयाजवळ गोंधळ घातला. मुरजी पटेलांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे.

मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी रमेश लटके यांनी त्यांचा 16 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. मात्र काही महिन्यांपूर्वी रमेश लटके यांचे निधन झाल्याने अंधेरीत पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेले आणि उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी देण्यात आली, यामुळे ही पोटनिवडणुक चुरशीचे होणार असल्याचे चित्र होते. मात्र भाजप नेतृत्त्वाने मुरजी पटेल माघार घेणार असल्याची घोषणा केली. ज्यामुळे पटले यांच्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला आहे. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली आहे. भावना अनावर झालेल्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्दांचाही वापर केला.

- Advertisement -

कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे मुरजी पटले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. मुरजी पटेल यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरातील जीवन ज्योत कार्यालयाबाहेर मोठ्यासंख्येने भाजप समर्थक जमा झाले होते. यावेळी पटेलांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी जाहीर केली.

मुरजी पटेल यांनी निवडणूक कार्यालयात दाखत होत आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर पटेल संतप्त कार्यकर्त्यांना चकवा देत बाहेर पडले. मुरजी पटेल हे सध्या भाजपच्या दादरमधील कार्यालयात असल्याची माहिती समोर आली आहे. मुरजी पटेल यांचे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत भाजपला निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी अर्ज का दाखल करायला सांगितला? असा सवालही उपस्थित केला.


भाजपाने उमेदवारी का मागे घेतली? बावनकुळे म्हणाले निवडून येणाऱ्या आमदाराला…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -