घरताज्या घडामोडीविधान भवनाबाहेर शिवसेना आमदार सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

विधान भवनाबाहेर शिवसेना आमदार सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Subscribe

विधान भवनाबाहेर मतदानाच्या निकालात शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन्ही आमदारांचा विजयी झाला आहे. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून विधान भवनाबाहेर जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

विधान भवनाबाहेर मतदानाच्या निकालात शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन्ही आमदारांचा विजयी झाला आहे. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून विधान भवनाबाहेर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी (Slogan) सुरु केली आहे. (Shiv Sena MLA Sachin Ahir activists shouting slogans outside the Vidhan Bhavan)

“सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है” असा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. याशिवाय, “कोण कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. सचिन भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा लगातार कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.

- Advertisement -

सचिन अहिर यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना निकाला आधीच होता आहे. विधानपरिषदेच्या निडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे आमदार रिंगणात उतरले होते.

दरम्यान, विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडले. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. या १० जागांसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, भाजपाचे राम शिंदे, प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, उमा खापरे, शिवसेनेचे आमशा पाडवी, सचिन अहिर आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी झाले.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक मतमोजणीवेळी दोन मते बाद, मविआ आणि भाजपाला मोठा धक्का

सर्व उमेदवारांची उमेदवारांची यादी 

शिवसेना 

  • आमशा पाडवी –  26 विजयी
  • सचिन अहिर – 26 विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस 

  • रामराजे नाईक निंबाळकर – 26 विजयी
  • एकनाथ खडसे – 27 विजयी

काँग्रेस 

  • चंद्रकांत हंडोरे २२ मतांनी विजयी
  • भाई जगताप निकाल बाकी

भाजप 

  • प्रसाद लाड – निकाल बाकी
  • उमा खापरे – 26 विजयी
  • राम शिंदे – 26 विजयी
  • प्रविण दरेकर – 26 विजयी
  • श्रीकांत भारतीय – 26 विजयी

हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीत भाजपची बाजी, १० व्या जागेवर प्रसाद लाड विजयी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -