घरमनोरंजनपुष्पाची मूर्ती साकारणाऱ्या औरंगाबादच्या सोहनने घेतली अल्लू अर्जुनची खास भेट

पुष्पाची मूर्ती साकारणाऱ्या औरंगाबादच्या सोहनने घेतली अल्लू अर्जुनची खास भेट

Subscribe

अल्लू अर्जुनने सोहनचे आभार मानत आतापर्यंत त्याला मिळालेल्या फिल्म फेअर अवॉर्डच्या च्या रांगेत ठेवली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (allu arjun) याचा ‘पुष्पा’ (pushpa) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. तर बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतरही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले पण पुष्पाची जादू काही ओसरली नाही. दरम्यान औरंगाबादच्या सोहन कुमारने अभिनेता अल्लू अर्जुन याचा एक भन्नाट पुतळा साकारला आहे आणि तो पुतळा अल्लू अर्जुनला भेट म्हणून द्यावा अशी सुद्धा सोहनची (sohan kumar) इच्छा होती. त्याची हीच इच्छा आता प्रत्यक्षात साकार झाली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनने सोहनला आपल्या घरी बोलावून त्याची भेट स्वीकारली आहे.

सोहन आणि अल्लू अर्जुन यांची भेट हैद्राबादमधल्या अल्लू अर्जुन फॅन क्लबचे प्रेसिडेंट रवीकुमार गड्डम यांच्या मुळे शक्य झाली. रवीकुमार गड्डम यांच्या पुढाकाराने सोहनची इच्छा पूर्ण झाली. हैद्राबाद येथे असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या घरी ही भेट झाली. त्यावेळी तिथे अल्लू अर्जुनचे (allu arjun) सासरे चंद्रशेखर रेड्डी सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा सोहनच्या या कलेचं खूप कौतुक केले आणि त्या नंतर सोहन कुमार यांनी अल्लू अर्जुनला स्वतः तयार केलेला पुतळा भेट दिला. अल्लू अर्जुनने स्वतःचा पुतळा पाहत सोहन कुमार(sohan kumar) यांच्या कलेला दाद दिली आणि सोहनचे आभार मानले. सोहनने दिलेली मूर्ती अल्लू अर्जुनने आतापर्यंत त्याला मिळालेल्या फिल्म फेअर अवॉर्डच्या च्या रांगेत ठेवली आहे. सोहन सोबतच सोहनचे कुटुंबीय सुद्धा त्या क्षणाचे साक्षिदार होते. अल्लू अर्जुनने सोहनच्या कुटुंबीयांची सुद्धा आवर्जून भेट घेतली. त्यामुळे बनवलेली मूर्ती ही योग्य ठिकाणी पोहोचली असं सोहन यांनी सांगितले.

- Advertisement -

अल्लू अर्जुनचा (allu arjun) पुतळा तयार करणारे सोहन कुमार हे स्वतः फोटोग्राफी आणि विडिओ एडिटिंगचे काम करतात. अल्लू अर्जुनाची हातात बंदूक घेतलेली मूर्ती ही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आली आहे आणि ही मूर्ती बनविण्यासाठी सोहन यांना १२ तास एवढा लागले. या मूर्तीची उंची ६ इंच आहे. त्याचबरोबर या मूर्तीवर रंगकाम सुद्धा करण्यात आले. ही मूर्ती काचेच्या पेटित ठेवण्यात आली. त्याचबरोबर सोहन कुमार (sohan kumar) यांनी लोकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून खडूपासून मीराबाई, श्री स्वामी समर्थ, साई बाबा आदींच्या ५० पेक्षा अधिक मूर्ती साकारल्या आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -