घरमहाराष्ट्रincome tax Raid : यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ! कंपनी व्यवहार मंत्रालयाचे...

income tax Raid : यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ! कंपनी व्यवहार मंत्रालयाचे गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात यशवंत जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठीचे आदेश दिले आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाने मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, प्रधान डिलर्ससह 6 कंपन्यांविरुद्ध भारतीय दंड विधान (भादंवि) कलम 420, 120 ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. दरम्यान या तक्रारीमध्ये यशवंत जाधव यांच नाव नाही. मात्र या सगळ्या कंपन्या यशवंत जाधव यांच्याशी संबंधीत असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालय (MCA) ने म्हटले आहे. यशवंत जाधव यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या तपासादरम्यान या कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी काळात यशवंत जाधव यांच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकतात.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली. यावेळी तपासात असे आढळून आले की, या कंपनीचे शेअरहोल्डिंग असलेल्या दोन संस्था कोलकत्तामध्ये आहेत. स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या अशी नाव असलेल्या या शेल कंपन्या कोलकत्तामध्ये एन्ट्री ऑपरेटर्सनी तयार केल्या आहेत. याच कंपन्यामार्फत 15 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज देण्यात आले. जाधव यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या रोख रकमेच्या बदल्यात कंपनीने असुरक्षित कर्जे दिली. त्यामुळे या कंपन्यांमार्फेत मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप होत आहे.

- Advertisement -

नेमक प्रकरण काय आहे?

यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांची अलीकडेच आयकर विभागाने चौकशी केली. या चौकशी अहवालात शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत रोख रक्कम या कंपनींना देण्यात आली तसेच या कंपनीच्या माध्यमातून कायदेशीर एन्ट्री स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या नावे करण्यात आली. कर्जाच्या स्वरुपात या शेल कंपन्यांच्या माध्यमातून कुटुंबातील इतर सदस्यांना पैसे देण्यात आले. एकूण १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्य़ाकडून वेगवेगळ्या खात्यातून कर्ज म्हणून दिले आहेत.

दरम्यान आयकर विभागाच्या अहवालानुसार, 2019 – 20 या काळात उदय शंकर महावर या व्यक्तीकडून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना 15 कोटी रुपये दिले गेले. हे 15 कोटी रोखीने यशवंत जाधव यांनी उदय महावर यांना दिले. यानंतर उदय महावर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यामध्ये लीगल एन्ट्री करून घेतली. या 15 कोटीपैकी 1 कोटी यामिनी जाधव यांना कर्ज म्हणून देण्यात आले आणि याची नोंद त्यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रात दाखवले आहे.

- Advertisement -

त्यामुळे प्रधान डिलर्स यांच्या स्कायलिंक कमर्शीयल लिमिटेड आणि सुपरसाॅफ्ट सप्लायर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या माध्यमातून काळे पैसे पांढरे करण्यात आले. यावेळी आयकर विभागाने तपास करत चंद्रशेखर राणे, क्रिष्णा भनवारीलाल तोडी आणि धीरज चौधरी यांचा जबाब नोंदवला. या दोघांनी कबुली देत कंपनीचे बनावट संचालक असल्याचे सांगितले. या दोन्ही कंपन्या या शेल कंपन्या असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. उदय शंकर महावरकडे कंपनीचे नियंत्रण आहे. हा कोलकत्तामध्ये एन्ट्री ऑपरेटर आहे. या कंपन्या काळा पैसा पांढरा करून देतात. याप्रकरणी उदय महावरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान उदय शंकर महावर याने यशवंत जाधव यांच्या कुटुंबीयांना अशाप्रकारे असंख्य एन्ट्रीज केल्याचा आयकर विभागाला संशय आहे. तसेच इतर शेल कंपन्यांकडून अशाप्रकारे कोट्यावधींच्या व्यवहार केला गेल्याचा संशय असून त्याचा तपास आयकर विभाग करत आहे.


घोटाळ्याशी संबंध असलेले नेते भाजपामध्ये गेल्यावर त्यांची कारवाई थांबते – छगन भुजबळ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -