घरमहाराष्ट्रघोटाळ्याशी संबंध असलेले नेते भाजपामध्ये गेल्यावर त्यांची कारवाई थांबते - छगन भुजबळ

घोटाळ्याशी संबंध असलेले नेते भाजपामध्ये गेल्यावर त्यांची कारवाई थांबते – छगन भुजबळ

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेते विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाजपा आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेते विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाजपा आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर टीका केली आहे. ‘भाजपकडूनईडीचा दुरुपयोग होत असून आमच्या पुर्वजांनी घेतलेल्या प्रॉपट्याही ईडीनं जोडल्या आहेत’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. तसंच, राज ठाकरे यांच्यावरही आरोप करत निशाणा साधला आहे.

“ईडी अटक करताच जामीन मिळणं कठीण असतं, ईडीचा कायदा हा राक्षसी कायदा आहे, आधी राज्य सरकारच्या चुका दाखवा, वैयक्तिक आरोप कशासाठी? असा सवाल भुजबळांनी केला. भाजपकडूनईडीचा दुरुपयोग होत असून आमच्या पुर्वजांनी घेतलेल्या प्रॉपट्याही ईडीनं जोडल्या आहेत. भारतात अशी असंख्य प्रकरणं, केसेस पूर्ण झाल्याचं नाही आणि प्रॉपर्टी अटँच राहतात. भाजपविरोधात बोललात, की काहीना काही शोधून कारवाई करायचीचं, असं ठरवून कारवाई केली जाते. यात अनेक नेते भरडले जातायत, हे नाकारता येत नाही. घोटाळ्यांशी संबंध असलेले अनेक नेते भाजपमध्ये गेले आणि त्यांच्यावरची कारवाई थांबली” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

- Advertisement -

“अनेक नेते भाजप विरोधात बोलायचे ते आता भाजपची प्रशंसा करायला लागले. ईडीचा प्रताप सर्वांना भोगावा लागतोय, जिथे जिथे भाजप विरुद्ध राज्य, त्या राज्यांना खिळखिळे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतायत. निवडणुकीला आता 2 वर्षे राहिली, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणुकीत उभे राहा, मग कळेल लोक कुणाच्या बाजूने, पुन्हा राज्य मिळावे, हे सरकार पडलं पाहिजे म्हणून असं जबरदस्तीने करणं योग्य आहे असं वाटत नाही. आम्ही कारवाई केली की जामीन मिळतो. ईडीन कारवाई केली की जामीन मिळत नाही. तुम्ही भाजपच्या विरोधात बोललात की कारवाई होते, तुम्ही विरुद्ध बोलणार नाही तोपर्यंत काही कारवाई होणार नाही, जे विरुद्ध बोलत नाही त्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही”, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं.

‘१९९९ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार’, असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. तसंच, यावर छगन भुजबळ यांनी ‘ईडीची नोटीस मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला’, असं आरोप करत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -