घरमहाराष्ट्रशिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही - पक्षप्रमुख उद्धव...

शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो मोडीत काढायचा आहे, त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मुंबई देखील रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून
आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा शिवसैनिक माझ्यासोबत आहे.

- Advertisement -

शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.


हेही वाचा – देशात कोरोना चाचणीचा दर समान असावा – सर्वोच्च न्यायलय

- Advertisement -

कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण १०० लॅब केल्या आहेत आणि आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसं की, मास्क, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज आदी वस्तू दिल्या जात आहेत. जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. देशावरती चीन नावाच संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता माननीय पंतप्रधान यांच्यासोबत मिटींग आहे. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. वादळ येऊदेत, चक्रीवादळ येऊदेत अजून कोणतंही संकट येऊदेत तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सत्ता हाती घेतल्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केलं – आदित्य ठाकरे

शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत होती. मात्र, जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केलं आहे. आपण आपली वचने पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे. पाच दशकं आपण जशी लोकांची सेवा केली तशी पुढेही आपल्याला सेवा करायची आहे. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे आणि त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा हा प्रयत्न आपला असायला पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -