घरCORONA UPDATEदेशात कोरोना चाचणीचा दर समान असावा - सर्वोच्च न्यायालय

देशात कोरोना चाचणीचा दर समान असावा – सर्वोच्च न्यायालय

Subscribe

कोरोना चाचणीचे दर समान संपूर्ण देशात समान असावेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

कोरोना चाचणीच्या दरावरुन देशात बराच गोंधळ आहे. देशात प्रत्येक राज्यात कोरोना चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशात कोरोना चाचणीचे दर समान असावेत, असा निर्देश दिला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची मृत्यूनंतर होणारी हेळसांड तसंच कोरोना उपचारांबाबत न्यायालयाने यापूर्वी भाष्य केलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कोविड-१९ चाचणीसाठी देशभरात एकच दर निश्चित करावा, असा आदेश दिला. तसंच सर्व वॉर्डांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. रुग्णांवर योग्य उपचार आणि मृतदेहाचे व्यवस्थापन या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की तज्ञांच्या पथकाने रुग्णालयांना भेट द्यावी जेणेकरून या प्रक्रियेतील त्रुटी आणि उणीवा दूर होऊ शकतील. न्यायालयाने रुग्णांची काळजी आणि मृतदेहाचे योग्य व्यवस्थापन करण्याचं आवाहन केलं. देशभरात कोरोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चीनी हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपेत होतं; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -