घरमहाराष्ट्रपरभणीत शिवसेना नगरसेवकाची निर्घृण हत्या

परभणीत शिवसेना नगरसेवकाची निर्घृण हत्या

Subscribe

वैयक्तिक कारणावरुन दोन जणांनी शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या केली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

परभणीमध्ये शिवसेना नगरसेवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जायकवाडी भागामध्ये ही घटना घडली आहे. वैयक्तिक कारणावरुन दोन जणांनी नगरसेवकाची हत्या केली आहे. अमरदीप रोडे असं नगरसेवकाचे नाव आहे. डोक्यात दगड आणि कुऱ्हाडीने वार करुन अमरदीप यांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे.

अमरदीप रोडे यांचे त्यांच्या मित्रांसोबत किरकोळ वाद झाला. या वादातून रवी गायकवाड आणि किरण ढाके या दोघांनी अमरदीप यांची आज सकाळी हत्या केली. अमरदिप यांच्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. वैयक्तिक कारणातून हत्या केली असल्याचे समजतेय. मात्र नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून या हत्येचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -