घरताज्या घडामोडीआक्षेपार्ह शब्दावर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपवर राऊतांचा पलटवार, योगींचा 'तो' व्हिडिओ केला...

आक्षेपार्ह शब्दावर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपवर राऊतांचा पलटवार, योगींचा ‘तो’ व्हिडिओ केला ट्विट

Subscribe

भाजप नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांविरोधात आता संजय राऊत यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्षेपार्ह विधान करत आहेत. राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपच्या नेत्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांनी जो शब्द उच्चारला आहे तोच भाजपच्या नेत्यानं उच्चारला असल्यामुळे आता भाजप काय प्रतिक्रिया देणार असा प्रश्न पडला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी स्वतः खुर्ची आणून दिली. दिल्लीत शरद पवार निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी राऊतांनी केलेली धावपळ पाहून भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. याला राऊतांनी प्रत्युत्तर देताना टीका करणारे ** आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नये. हे त्या **** लोकांना समजत नाही. ही **** बंद करा असे वक्तव्य संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर देताना केलं आहे.

- Advertisement -

खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन मुंबईतील मरिनलाईन्स पोलीस स्टेशनबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी आंदोलन केलं आहे. दरम्यान विरोधकांच्या टीकांवर राऊतांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ योगींनी लस घेतल्यानंतरचा आहे. यामध्ये योगींनी एनआयए या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना अपशब्द उच्चारला आहे. व्हिडिओत आलेल्या अडथळ्यांमुळे योगी म्हणालेत की, ये ****पने का, दरम्यान योगींचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल देखील झाला होता. हा व्हिडिओ ट्विट करत राऊतांनी लिहिले आहे की, ‘दुनिया में **योंकी कमी नही, एक धूंडो तो हजार मिलेंगे, जरा योगिजी को सूनीये’ अशा आशयाचे ट्विट राऊतांनी केलं आहे. दरम्यान आता राऊतांनी केलेल्या ट्विटवर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ज्यांनी आडवाणींना समोर उभंही राहू दिलं नाही… राऊतांचा खुर्चीच्या मुद्द्यावर भाजपला टोला


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -