घरमहाराष्ट्रसीमेवर खिळे ठोकले तर लोक बोलणारच- उर्मिला मातोंडकर

सीमेवर खिळे ठोकले तर लोक बोलणारच- उर्मिला मातोंडकर

Subscribe

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन देशात गदारोळ निर्माण झाला आहे. या आंदोलनात सेलिब्रिटींसह विदेशी कलाकारांनीही समर्थनार्थ आणि विरोधात मत व्यक्त करत आहेत. यात आता शिवसेना नेत्या, अभिनेत्री उर्मिला उर्मिला मातोंडकर यांनी देखील उडी घेतली आहे. यावेळी तिने शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका मांडत केंद्राच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच फडणवीसांनीही विचारपूर्वक बोलावं असा सल्लाही तिने यावेळी दिला.
उर्मिलाने एका मुलाखतीत उर्मिलाने केंद्र सरकारला विरोध करत, शेतकरी आंदोलन नक्कीच भारताचा मुद्दा आहे आणि तो आपणच सोडवला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. त्य़ामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीविरोधात आंदोलन अमेरिकेत आंदोलन झाले तेव्हा आपणही निंदा केलीच ना? सीमेवर खिळे ठोकणारी प्रतिमा जगासमोर गेली तर लोक बोलणारच ना. अशी खरमरीत टीका केंद्र सरकारवर केली आहे.

त्याचप्रमाणे शरजीलच्या विधानाचाही तिने तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावर बोलताना तिने, शरजीलनं केलेल्या विधानाचा निषेधच आहे, कुठल्याही धर्माचा अपमान करण चुकीचं आहे. मी त्याच्या विधानाचा जाहीर निषेधच करणेनं. कारण आपल्या देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या, जतीच्या व्यक्तीने कोणत्याही विषयावर बोलताना विचारपूर्वक बोलाव. असे ती म्हणाली. उर्मिलाने याआधी शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता. उर्मिलाच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शेतकरी आंदोलनाच्या बाजून बोलतान सांगतो, आपल्यांसाठी लढलो तर योद्धा आणि इंग्रजांविरुद्ध लढलो तर देशभक्त. कोरोना काळात लोकांना जेवण वाटले, सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर देशप्रेमी. परंतु आता आमचा अधिकार मागितला तर खलिस्तानवादी किंवा आतंकवादी. हा कोणता कायदा आहे.? त्यामुळे उर्मिलाही आता आंदोलक शेतकऱ्याच्या बाजूने उभी राहिली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -