घरमहाराष्ट्रयोगींनी फिल्मसिटी उभी करावी आणि चालवून दाखवावी - संजय राऊत

योगींनी फिल्मसिटी उभी करावी आणि चालवून दाखवावी – संजय राऊत

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच चर्चेत आहे. युपीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी एक हजार एकर जागेत फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केल्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. योगीजींना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक फिल्मसीट उभारावी आणि ती चालवून दाखवावी, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबईतून ओरबडून नेण्याचे, खेचून नेण्याचे याआधी अनेकांनी प्रयत्न केले. पण ते काही शक्य झाले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हे साधू आहेत. ते नरिमन पॉईंटच्या सप्त तारांकित हॉटेलच्या भव्य सूटमध्ये भगव्या कपड्यामध्ये बसून काही चित्रपट कलाकारांना भेटतात. अक्षय कुमारला मी पाहिले, बहुतेक आंब्याची पेटी घेऊन गेले असतील चुपण्यासाठी, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. मुंबईची फिल्मसिटी अशी कोणाला हलवता येते का? तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारायची आहे म्हणून मुंबईची फिल्मसिटी हलवत आहात. काही वर्षांपूर्वी नोएडामध्ये फिल्मसिटी उभारण्यात आली. त्याचे काय झाले. हे आधी मुंबईत येऊन आमच्या फिल्मसीटीला येऊन सांगावे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

मुंबईची फिल्मसिटी खूप मोठी आहे. तसेच तामिळनाडूची फिल्मसिटी खूप मोठी आहे. तिथे दक्षिणेसोबत हिंदी चित्रपटांची निर्मिती होते. रजनिकांत, नागाअर्जून आदी हिंदीत काम करतात. फिल्म इंडस्ट्री जशी मुंबईत आहे तशी तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक, केरळ, प.बंगालमध्येपण आहे. मग योगी आदित्यनाथ तिथेही जाऊन अभिनेते, निर्मात्यांशी बोलणार का? त्यांनाही यूपीत घेऊन जाणार का? की त्यांचा पंगा फक्त मुंबई आणि महाराष्ट्राशी आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. योगीजींना आमच्या शुभेच्छा आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दिमधअये एक फिल्मसीट उभारावी आणि ते चालवून दाखवावी, असे आव्हान राऊतांनी दिले. तुम्ही भिंती उभ्या कराल, चांगले छप्पर घालाल, झाडे, पाने, फूले लावाल. पण जी यंत्रणा मुंबईत आहेत, जलसा, प्रतिक्षा रामायण हे जे बंगले आहेत, ज्यामध्ये आमचे कलाकार राहतात, ते सर्व उत्तर प्रदेशला घेऊन जाणार आहात का? असा सवाल करत फिल्मसीटी निर्जीव नसते, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -