घरमुंबई'पंकजा ताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे'; धनंजय मुंडेंकडून भावनिक साद

‘पंकजा ताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे’; धनंजय मुंडेंकडून भावनिक साद

Subscribe

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. ‘पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,’ अशी भावनिक सादच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना घातली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंकजा मुंडे यांनी स्वतःला सर्दी खोकला व ताप याचा त्रास होत असल्याच्या माहिती ट्विट करीत दिली होती. ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले होते. या ट्विट ला कमेंटसह धनंजय मुंडे यांनी री ट्विट केले असून पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे सांगत एकप्रकारे भावनिक साद घातली आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन त्यासंदर्भातील सर्व योग्य त्या चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोन करून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या आता होम आयसोलाटेड आहेत. पंकजा मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती आज सकाळीच समोर आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती दिली होती.

धनंजय मुंडेंना जून महिन्यात कोरोनाची लागण

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले होते. काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून बरे झाले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र पोटदुखीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून त्यांना होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती गठीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -