घरपालघरधक्कादायक! रस्ता नसल्याने झोळीतून नेलं, विषारी सर्पाच्या दंशामुळे सरपंचासह जावयाचा मृत्यू

धक्कादायक! रस्ता नसल्याने झोळीतून नेलं, विषारी सर्पाच्या दंशामुळे सरपंचासह जावयाचा मृत्यू

Subscribe

उशीर झाल्यामुळे सापाचे विष त्यांच्या रक्तात भिनले गेले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेताना उशीर झाल्याने त्यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला.

मुरबाड – रस्त्याअभावी नुकत्याच प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुरबाडमधूनही अशीच एक घटना उजेडात आली आहे.तालुक्यातील आदिवासी सरपंच महिलेसह त्यांच्या जावयाला विषारी सर्पदंश  झाल्याने त्यांना रस्त्याअभावी नाईलाजास्तव झोळीतून घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना ओजिवले कातकरीवाडीत घडली आहे. अशाचप्रकारे तालुक्यातील अनेक आदिवासी गावपाड्यांंत रस्त्याअभावी आदिवासींच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. यावरून शिंदे आणि फडणवीस सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले, पालघरप्रकरणी शिवसेनेची जळजळीत टीका

- Advertisement -

राज्यातील सर्वप्रथम कॅशलेस गाव म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील धसई बाजारपेठजवळील ओजिवले गावाच्या हद्दीतील कातकरवाडीत २० कुंटुबातील ६० आदिवासी बांधव राहतात. या पाड्यातील अदिवासींना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दीड किमी पायपीट करावी लागते. त्यातच ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या चार वाजल्याच्या सुमारास या पाड्यातील सुभाष टिकाराम वाघ वय ३५ वर्ष यांना घरातच झोपेत असताना विषारी सापाने दंश केला. त्यांना टोकावडे येथील शासकीय रुग्णालयात रस्ता नसल्याने नाईलाजास्तव झोळीतून घेऊन गेले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास उशीर झाला. त्यांच्या संपूर्ण अंगात विष भिनल्याने त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे मागील महिन्यात आठ ऑगस्ट रोजी मृत सुभाष यांच्या सासू बारकाबाई किसन हिलम वय ५५ वर्ष ह्या गावच्या सरपंच असून त्यांनाही घरातच विषारी सापाने दंश केला होता. वाडीत जायला व्यवस्थित रस्ता नाही. त्यामुळे त्यांनाही नातेवाईकांनी रस्त्याअभावी झोळीतून, चिखल झालेल्या रस्त्यातून पायपीट करत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रस्त्याअभावी रुग्णालयात न्यायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे सापाचे विष त्यांच्या रक्तात भिनले गेले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेताना उशीर झाल्याने त्यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पालघरमध्ये जुळ्या बालकांच्या मृत्यूप्रकरणी उपाययोजना करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आम्ही आदिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला कोणत्याही सोईसुविधा मिळत नाहीत. आणि म्हणूनच आमच्या वाडीत जाण्यायेण्यासाठी धड रस्ता नसल्याने रस्त्याअभावी दोघांचे बळी गेल्याची खंत कुंटुब प्रमु़ख किसन राजाराम हिलम यांनी व्यक्त केली. जर या वाडी येण्या-जाण्यासाठी रस्ता असता, तर सरपंच असलेल्या माझ्या पत्नीचे व जावयाचे प्राण वाचले असते असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच रस्त्याअभावी अजून आमच्या आदिवासी बांधवांचे किती बळी जाण्याची वाट शासन पहाणार आहे. शासनाने आता तरी आमच्या रस्त्यांंचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत.

सदर व्यक्तीस धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून आमच्या रुग्णालयात आणले होते. आम्ही त्याच्यावर उपचार केले. परंतु जास्त उशीर झाल्यामुळे तो रुग्ण दगावला”, असं टेकावडे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकर सुतार यांनी सांगितलं.

आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते व विकासात्मक सोईसुविधा नसल्याने आदिवासी बांधवांना नाहक जीव गमवावा लागतो. तरी शासनाने त्वरित रस्ते व सोईसुविधा न दिल्यास आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत, असं अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष दिनेश जाधव यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -