खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले, पालघरप्रकरणी शिवसेनेची जळजळीत टीका

वैद्यकीय सुविधा वेळेत मिळू न शकल्याने नवजात निष्पाप जुळ्या मुलांचा यावेळी मृत्यू झाला. महिलेची परिस्थिती गंभीर बनल्याने गावकऱ्यांनी महिलेला झोळीत भरून पायी रस्ता तुडवत हॉस्पिटलपर्यंत नेले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान, शिवसेनेनेही यावरून आता जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

palghar incident

पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच वंदना बुधर हिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू गंभीर आहे. नुसत्या थातूरमातूर चौकशीचे आदेश देऊन भागणार नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य २२५९, महिला आणि बालविकास १६७२, सामाजिक न्याय विकास सहाय्य २६७३, आझादीचा अमृत महोत्सव ५०० असे सर्व कोटीतले आकडे आहेत. शिवाय रस्त्यांसाठी शेकडो कोटींचे वेगळे आकडे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? असा रोखठोक सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा धक्कादायक! रस्ता नसल्याने महिलेची घरातच प्रसूती, जुळ्या बालकांचा उपचारांअभावी मृत्यू

पालघर येथील मार्कटवाडी येथे काही दिवसांपूर्वी दोन नवजात निष्पाप जुळ्यांचा मृत्यू झाला. रस्ता नसल्याने एका महिलेची घरातच प्रसूती करावी लागली. वैद्यकीय सुविधा वेळेत मिळू न शकल्याने नवजात निष्पाप जुळ्या मुलांचा यावेळी मृत्यू झाला. महिलेची परिस्थिती गंभीर बनल्याने गावकऱ्यांनी महिलेला झोळीत भरून पायी रस्ता तुडवत हॉस्पिटलपर्यंत नेले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान, शिवसेनेनेही यावरून आता जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला काय झाले आहे असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाला पडला आहे. प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेस लकवा मारला आहे. सध्या मुसळधार पाऊस, महाप्रलय वगैरे चिंतेचे वातावरण म्हणजे अस्मानी संकट आहे. पण लकवा मारलेली आरोग्य व्यवस्था म्हणजे फडणवीस शिंदे गट सरकारची सुलतानी आहे.

हेही वाचा – पालघरमध्ये जुळ्या बालकांच्या मृत्यूप्रकरणी उपाययोजना करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

सुरत-गुवाहटीचे एखाद-दुसरे खोके रस्त्यांच्या कामी आले असते तर वंदना बुधर हिची जुळी मुले वाचली असती. पण दुर्दैव तिचे. आजही मुंबईजवळ असलेल्या मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आजारी महिलांना, वृद्ध रुग्णांना डोलीने प्रवास करावा लागतोय. तेव्हा कोणत्या विकासाच्या गप्पा आपण मारतोय? कोरोना काळात उत्तम आरोग्य व्यवस्थापन करणाऱ्या महाराष्ट्राचे जगाने कौतुक केले. घराघरात, आदिवासी पाड्यांवर तेव्हा आरोग्य सेवा पोहोचवण्यात आली हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कसब होते. ते फक्त दोन तीन महिन्यांत नष्ट झाले. पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड जमावाने केले तेव्हा हिंदुत्तव खतऱ्यात आले म्हणून सरकारवर हल्ले करणाऱ्या भाजपवाल्यांना वंदना बुधर व तिची जुळी मुले हिंदू वाटू नयेत व या हत्याकांडावर त्यांनी तोंड उघडू नये, या ढोंगास काय म्हणावे? पालघरमधील साधू हत्याकांडाइंतकात वंदना बुधर हिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू गंभीर आहे. त्यामुळे फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.