घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिद्धिविनायक पतसंस्थेत गैरव्यवहार करणार्‍याला पाठीशी घालणार नाही : सभापती

सिद्धिविनायक पतसंस्थेत गैरव्यवहार करणार्‍याला पाठीशी घालणार नाही : सभापती

Subscribe

नाशिक : येथील सिद्धिविनाक नागरी सहकारी पतसंस्थेत दिलेल्या अधिकार व विश्वासाचा गैरवापर करत लेखापाल दिनेश बापुराव शौचे याने जो अपहार केला आहे तो संस्थेच्या विश्वसनीय वाटचालीत निश्चितच क्लेशदायक आहे. गेली ३९ वर्षे पारदर्शक कार्य करत सर्वांच्या सहकार्याने संस्था प्रगतीपथावर नेली. सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. संस्थेत गैरव्यवहार करणार्‍याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. चुकीला माफी मिळणार नसून, कारवाई अटळ असल्याचे सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आढाव यांनी सांगितले.

ओझर येथील सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेत सुमारे तीन कोटींचा अपहार लेखापाल दिनेश शौचे याने केल्याचे प्रकरण ‘आपलं महानगर’ने उघडकीस आणल्यानंतर ओझरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आढाव यांनी ‘आपलं महानगर’कडे भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचा लेखापाल दिनेश शौचे याने संस्थेने दिलेल्या अधिकाराचा व विश्वासाचा गैरवापर करत अत्यंत सराईत गुन्हेगाराप्रमाणे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीत मोठा अपहार केला. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत विश्वसनीय वाटचालीत ही घटना निश्चितच दुःखदायी आहे. मात्र या घटनेमुळे काही लोकांनी अफवा पसरवल्या. संस्थेचे काही पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यात सहभागी असल्याचे चुकीचे सांगण्यात आले. संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे याने केलेल्या अपहाराशी संस्थेचे पदाधिकारी संचाकल मंडळ व इतर कर्मचारी यांचा काहीही संबंध नाही. संस्थेत गैरव्यवहार करणार्‍याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम 

संस्था गेल्या ३९ वर्षांपासून सुस्थितीत आहे. संस्थेच्या ४५ कोटी इतक्या ठेवी आहेत. संस्था प्रत्येक वर्षी लाभांश वाटप करते. संस्थेने कर्जवाटपदेखील सुरक्षितरित्या केले असून, त्या माध्यमातून चांगला नफादेखील सातत्याने मिळवला आहे. संस्थेची स्वमालकीची भव्य इमारत असून संस्थेचे हायवेफ्रंट १८ कोटींपेक्षा जास्त किंमतीचे गोडाऊन, भूखंड आहेत. संस्थेने १८ कोटी ९६ लाख रुपयांची इतर बँकेत गुंतवणूक केली आहे. एकूणच संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम असून संस्थेच्या ठेवीदार, कर्जदार, खातेदार, हितचिंतकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थेच्या संचालक व कर्मचार्‍यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यात तक्रार

संस्थेने अपहार प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून ओझर पोलीस ठाण्यात लेखापाल दिनेश शौचे याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रारदेखील दाखल केली असल्याची माहितीही प्रभाकर आढाव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -