घरताज्या घडामोडीपालघरमध्ये जुळ्या बालकांच्या मृत्यूप्रकरणी उपाययोजना करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पालघरमध्ये जुळ्या बालकांच्या मृत्यूप्रकरणी उपाययोजना करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

देशात अमृतमहोत्सव साजरा होत असतांना पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली होती. अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये एका गर्भवती महिलेला आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्यामुळे जुळ्या बाळांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला. एवढंच नाहीतर या महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला होता.

देशात अमृतमहोत्सव साजरा होत असतांना पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली होती. अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये एका गर्भवती महिलेला आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्यामुळे जुळ्या बाळांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला. एवढंच नाहीतर या महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला होता. याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली जाणार असून, पुढच्या काही दिवसांत विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे म्हटले. (Death of Palghar Twins Taking notice of the incident measures will be taken Chief Minister assurance)

“हा विषय खूप गंभीर आहे. याआधीही अशी घटना घडली होती. याविषयी शासनही गंभीर आहे. ज्यावेळेस अशा घटना घडतात. त्यावेळी शासन त्या घटनेचा विचार करते, उपाययोजनाही करते. परंतु आदिवासी भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था असेल, पादचारी पूलांच्या समस्या असतील, या सगळ्या समस्यांचा विचार करून पुढच्या काही दिवसांत विचार करून उपाययोजना केल्या जातील”, असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

- Advertisement -

याशिवाय, “यापुढे आदिवासी भागातील कोणत्याही महिलेला गैरसोयो होणार नाही, याची दखल घेतली जाईल. तसेच, याबाबत शासन विचार करून उपाययोजना करेल”, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर होती. तिला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला. आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली. तिने 108 ला संपर्क साधून रुग्णवाहिका सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता न्हवता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या. तिची प्रसूती घरातच झाली. तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते. त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करणे आवश्यक होते.

काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला. दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती, तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – अजित पवारांच्या पहिल्याच प्रश्नाने सरकारची दांडी गुल, आरोग्यमंत्र्यांनी उत्तरासाठी मागितली वेळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -