घरमहाराष्ट्रसंभाजीनगर राड्यासंदर्भात धक्कादायक खुलासे; 'या' तीन अफवांमुळे झाला राडा

संभाजीनगर राड्यासंदर्भात धक्कादायक खुलासे; ‘या’ तीन अफवांमुळे झाला राडा

Subscribe

एसआयटीने सादर केलेल्या रिपोर्टनुसार, धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, अफवा पसरवल्या गेल्याने राडा झाल्य़ाचे या रिपोर्टमध्य़े नमूद करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या पूर्वसंध्येला राडा झाला होता. या राड्याच्या चौकशीसाठी SITची स्थापना करण्यात आली होती. आता या एसआयटीने सादर केलेल्या रिपोर्टनुसार, धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, अफवा पसरवल्या गेल्याने राडा झाल्य़ाचे या रिपोर्टमध्य़े नमूद करण्यात आले आहे. (Shocking Revelations Regarding Sambhajinagar Rada There was an uproar due to these three rumours )

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला राडा हा अफवांमधून झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातील दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हा वाद मिटवलादेखील होता. मात्र, त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव किराडपुरा येथे जमा झाला. एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आलं आहे. मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवलं आहे. शहादगंजमध्ये दंगल उसळली आहे, यासह काही अफवा पसरल्यानेच जमाव जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

रामनवमीच्या पूर्वसंध्येला रात्री शहरातील किराडपुरामध्ये दोन गटात वाद झाला होता. या घटनेला 25 दिवस उलटले असून, पोलिसांकडून अजूनही फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर आतापर्यंत एसआयटीने 79 हल्लोखोरांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तसेच, इतर फरार आरोपींनादेखील ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकाकडून कारवाई सुरुच आहे. पोलीस घटनास्थळी असलेल्या परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन, हल्लेखोरांची ओळख पटवत आहेत.

( हेही वाचा: ‘मोदींचं वादळ, मशाल विझणार’; बावनुकळेंचा ठाकरेंना इशारा, कुठे सूर्य कुठे तुम्ही… )

- Advertisement -

नेमकं काय घडलं होतं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम जयंतीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी पोलिसांची अनेक वाहने पेटवून देण्यात आली, तर या राड्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले. दरम्यान, हा सर्व राडा कसा झाला याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एसआयटी पथकाची स्थापना केली त्यानंतर आता एसआयटीच्या तपासानंतर काही अफवा पसरवल्या गेल्या आणि त्यामुळे दंगल भडकल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -