घरमहाराष्ट्र'मोदींंचं वादळ, मशाल विझणार'; बावनुकळेंचा ठाकरेंना इशारा, कुठे सूर्य कुठे तुम्ही...

‘मोदींंचं वादळ, मशाल विझणार’; बावनुकळेंचा ठाकरेंना इशारा, कुठे सूर्य कुठे तुम्ही…

Subscribe

2024 मध्ये मोदींचं वादळ येणार आणि मशाल विझणार. मशाल तर विझणारचं कितीही मशाल लावलात तरी त्या विझणारच. कुठे सूर्य कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुठे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

2024 मध्ये मोदींचं वादळ येणार आणि मशाल विझणार. मशाल तर विझणारचं कितीही मशाल लावलात तरी त्या विझणारच. कुठे सूर्य कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुठे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.( BJP State President Chandrashekhar bawankule criticised Uddhav Thackeray over Narendra Modi )

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल, रविवारी जळगावात सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांनी एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

मोदींबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला. खरं तर त्यांनी अभ्यास करायला हवा. 150 हून अधिक देशांनी 78 टक्के पसंती ज्या नेतृत्त्वाला दिली, असे मोदी आणि त्यांचा हे एकेरी उल्लेख करतात. मोदीचं वादळ महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील. इतकं मोठं वादळ महाराष्ट्रात येणार आहे. ठाकरे हे मोदींच्या वादळाला घाबरतात म्हणून ते मोदी मोदी करतात.

( हेही वाचा: तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय ; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार )

- Advertisement -

हा बेईमानपणा आहे

मोदींची उंची काय, तुमची उंची काय. कधी विचार केला का?  तुमच्याकडे दोन लोक राहायला तयार नाहीत. मोदींची जागा सर्व जगाने मंजूर केली आहे. भारताला सर्वोत्तम देश बनवण्याचा निर्णय, संकल्प मोदी करतात आणि तुम्ही इथे त्यांची खिल्ली उडवता. ज्यांच्या विश्वासावर तुम्ही 2014 मध्ये तुमचे खासदार, आमदार निवडून आणले. तुमच्या बाजूला जे आता कोणी उरलेत तेसुद्धा मोदींच्या कृपेनं आलं आहे. त्यामुळे मोदींचा एकेरी उल्लेख करणे हा बेईमानपणा आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. 2024 मध्ये मोदींचं वादळ येणार आणि मशाल विझणार. मशाल तर विझणारचं कितीही मशाल लावलात तरी त्या विझणारच. कुठे सूर्य कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावलं.

…तर स्फोट होईल

सार्वजनिक ठिकाणी एखाद्या पक्षाच्या नेतृत्त्वाचा एकेरी उल्लेख वारंवार केल्याने एकदा स्फोट होऊ शकतो, असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशाराच दिला आहे.  मोदींचा एकेरी उल्लेख केल्याने एकदा असंतोष भडकेल. मागेच म्हणालो होती की, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना थोडं तारतम्य बाळगा. इतकं सांगूनही ठाकरे जाणीवपूर्व मोदींचा एकेरी उल्लेख करतात. किती दिवस एकेरी बोलण्याचा पक्षाचे कार्यकर्ते संयम पाळतील. ठाकरेंना एकेरी बोलण्याची खुली सूट आहे का?

सत्तेची तुम्हाला नशा चढली होती 

धृतराष्ट्रासारखे तुम्ही सत्तेसाठी आंधळे झाले होते. तुम्हाला सत्तेचं व्यसन लागलं होतं. म्हणून लोक तुमच्यापासून लांब गेले. त्यात भाजपचा काय दोष? आमचं तुमच्यावर उपकार आहेत. आमच्यामुळे तुमचे खासदार, आमदार निवडून आले.

फडणवीस यांनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं. तुम्हाला पाच वर्षांत काहीही कमी पडू दिलं नाही. मातोश्रीवरुन जे सांगितलं गेलं ते फडणवीस यांनी दिलं. तुमची आता जी अवस्था आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे. तसंच, आता ठाकरे बावचळलेल्या स्थितीत असल्याचंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -