घरमहाराष्ट्रभाजपला ‘चिता सरकार’ म्हणायचं का?’ - उद्धव ठाकरे

भाजपला ‘चिता सरकार’ म्हणायचं का?’ – उद्धव ठाकरे

Subscribe

मुंबई – भारतात 70 वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. आपल्या देशामध्ये अनेक वर्षांनी चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचे का? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. शिवसेना भवनमध्ये आयोजित विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुखांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी ही टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील निशाणा साधला. प्रताप सरनाईक यांची केस लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. मग केस मागे घेण्याची घाई का, असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सरनाईक भाजपसोबत गेल्यामुळे लाँड्रित टाकून, धुवून चकाचक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -