घरमहाराष्ट्रअखेर नितेश राणे यांना जामीन मंजूर

अखेर नितेश राणे यांना जामीन मंजूर

Subscribe

30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना अखेर बुधवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी मंगळवारी दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार नितेश राणे यांची 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा नितेश राणेंवर आरोप आहे. नितेश राणेंना कणकवली दिवाणी न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, राणेंच्या वकिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला होता. त्यानंतर न्यायलयाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

कणकवलीत येण्यास मज्जाव
काही अटींवर नितेश राणेंचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत आठवड्यातून एकदा नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच चार्जशीट दाखल झाल्याशिवाय कणकवलीत येण्यासही न्यायालयाने नितेश राणेंना मज्जाव केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -