घरमहाराष्ट्रSharad Pawar : पवार घराणे शरद पवारांसोबतच, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Sharad Pawar : पवार घराणे शरद पवारांसोबतच, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Subscribe

मुंबई : पवार घराणे शरद पवारांसोबत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शरद पवारांचा पक्ष काढून घेतले आणि त्यांचे बँक खाते बंद केले आहे, हा शरद पवारांचा अपमान नाही का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्त शिक्षण, ज्ञान आणि लिडरशीप करण्यासाठी सक्षम आहे. पण प्रत्येकांनी आपली मर्यादा सांभाळली होती की, शरद पवार यांना दुखवता कामा नये. मी युगेंद्र पवारांनी विचारले की, तू राजकारणा कस काय आलास? या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले, आमच्या घराची ओळख ही शरद पवार आहे. जेव्हा मी अंतरराष्ट्रीय पातळीवर जातो. त्यावेळी शरद पवारांचे नाव सांगतो, मला मनाने आणि विचाराने मान्यच होत नाही आणि सहनही करू शकत नाही की, शरद पवारांना सोडून देणे, ही जर शरद पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीची भूमिका असेल. त्यामुळे राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले,

- Advertisement -

हेही वाचा – Chhatrapati sambhajinagar : आता छत्रपती संभाजीनगरमधूनच थेट गाठा बँकॉक आणि सिंगापूर

राजेंद्र पवारांबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी लढणार होतो, पण पवारांनी मला लढू नको, म्हणून सांगितले, अशी राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे. यामुळे राजेंद्र पवारांच्या मनात शरद पवारांबद्दल किती आदर आहे. हे तुम्ही बघा”, असे त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना ज्या पद्धतीने अपमानित पक्ष आणि चिन्ह काढून घेतले आणि त्यांची बँकेतील खाते बंद केली आहेत. आता कार्यालयात घुसण्याचा अफवा आम्ही ऐकत आहोत. आता तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. पण हा शरद पवारांचा अपमान नाही का? हे महाराष्ट्राने आम्हाला सांगावे, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -