घरमहाराष्ट्रनाशिककोरोनापेक्षा विचारांची महामारी भयंकर

कोरोनापेक्षा विचारांची महामारी भयंकर

Subscribe

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर: मविप्र समाज शिक्षण संस्थेत नवीन इमारतींचे उद्घाटन

मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर या आपल्या भाषणात अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. पतींच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी वडीलांप्रमाणे प्रेम केले. त्यांचे हे ऋण आयुष्यभर राहणार असून, त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ संस्थेला अविस्मरणीय भेट देणार असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रु तरळले. पतीच्या अकाली निधनामुळे जीवनात येणारे दु:ख सांगण्यापलिकडचे असते, अशा भावना त्या व्यक्त करत असताना निलीमा पवार यांनाही आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर मविप्र ही शिक्षण संस्था मार्गक्रमण करत असल्याचा आनंद आहे. परंतु, या देशात कोरोनापेक्षा महाभयंकर विचारांची महामारी तयार झाली आहे. या महामारीवर विजय मिळवायचा असेल तर ‘मविप्र’सारख्या शिक्षण संस्थांना बळ देणे हे माझे कर्त्यव्यच आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर-सोनवणे यांनी केले.मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे तसेच कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील मुलींच्या वसतिगृह नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि.२) पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, सचीन पिंगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री ठाकूर म्हणाल्या, जातीभेद आणि अंधश्रद्धेविरोधात कर्मविरांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक आंदोलन उभे केले आहे. हे आंदोलन अजूनही सुरुच असून आहे. आंदोलन विचारांच्या महामारीविरोधात लढण्यासाठी शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विचार हरले तर या देशाचे वैचारिक पाया (फॅब्रिक) कमकुवत होईल. संत तुकडोजी महाराज यांनी ‘माणूस द्या मज माणूस द्या’ हा विचार दिला. याच पध्दतीचा माणून घडवण्याचे काम मविप्र शिक्षण संस्थेने सुरु केले आहे. त्यांना सर्वोतोपरी मदत करणे ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी प्रास्ताविक केले. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून होस्टेल सुरु करण्याचा विचार आहे. त्यासाठी कौन्सिलिंग सेंटर सुरु करावे लागेल. त्याचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल. शिक्षण सर्वदूर पोहोचलेले असले तरी मूल्यशिक्षण देणे ही काळजी गरज असून त्यादृष्टिने आम्ही यापुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यशोमती ठाकूर यांना मविप्र सभासद 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे माहेर अमरावती जिल्ह्यातील असून तिवसा या मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे सासर बागलाण येथील आहे. तसेच त्यांचे पती कै.राजेंद्र लक्ष्मण सोनवणे हे मविप्र संस्थेचे सभासद होते. त्यांच्या मृत्यू पश्चात यशोमती ठाकूर यांना हे सभासदत्व संस्थेने बहाल केले. संस्थेचे अध्यक्ष, सरचिटणीस व अन्य पदाधिकार्‍यांच्या हस्ते त्यांना सभासदत्वाचे आयकार्ड सन्माणपूर्वक प्रदान केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -