घरदेश-विदेशAfganistan Crisis: सव्वा लाख नागरिकांना काबुलमधून बाहेर काढले; अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी मानले...

Afganistan Crisis: सव्वा लाख नागरिकांना काबुलमधून बाहेर काढले; अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी मानले सैन्याचे आभार

Subscribe

अमेरिकेने अफगाणिस्तानातून १ लाख २४ हजारांहून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे, ज्यामध्ये सहा हजार अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे अमेरिकन संरक्षण मंत्री लॉयड जे ऑस्टिन यांनी सांगितले. तसेच त्यांनी अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याच्या ऑपरेशनवर असलेल्या अमेरिकन सेन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अफगाणिस्तानातील लष्करी मोहिमेच्या शेवटी पेंटागॉनमध्ये येथे ते बोलत होते.

ऑस्टिन असे म्हणाले की, अमेरिकेने सहा हजार अमेरिकन नागरिकांसह सव्वा लाख अफगाणिस्तानच्या लोकांना बाहेर काढले आहे. कोरोना सारख्या महामारीच्या जोखमीदरम्यान केलेल्या अमेरिकन सैन्याचा हा अभिमान आहे.ऑस्टिन असे म्हणाले की, अमेरिकेने सहा हजार अमेरिकन नागरिकांसह सव्वा लाख अफगाणिस्तानच्या लोकांना बाहेर काढले आहे. कोरोना सारख्या महामारीच्या जोखमीदरम्यान केलेल्या अमेरिकन सैन्याचा हा अभिमान आहे.

- Advertisement -

यासह अमेरिकेच्या इतिहासातील नागरिकांचे सर्वात मोठे हवाई स्थलांतर केले आहे. हे खूप धाडसाचे होते. मला आशा आहे सर्व अमेरिकन लोक एकत्र येतील आणि लष्कराचे साहस आणि धैर्याबद्दल आभार मानतील, असे ऑस्टिन म्हणाले. ऑस्टिनने अफगाणिस्तान युद्धात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, पुढच्या आठवड्यात मी आखाती देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी तेथे जाऊन ज्यांनी अफगाण नागरिकांना वाचवण्यात आणि त्यांना आश्रय देण्यात खूप मदत केली अशा माझ्या सहकाऱ्यांचे आभार देखील मानणार आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -