घरमहाराष्ट्रसर्पांच्या हालचाली टिपण्यास 'टॅग्स' बसवणे विचाराधीन

सर्पांच्या हालचाली टिपण्यास ‘टॅग्स’ बसवणे विचाराधीन

Subscribe

टॅगमुळे सर्पांच्या हालचाली टिपणे ही शक्य होईल.

जगात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. शिवाय, ज्या परिसरात झाडं झुडुपांचं प्रमाण अधिक आहे. त्या ठिकाणी अनेकदा सापांचं रेस्क्यू ऑपरेशन करणं कठीण जातं. सोबतच सापाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुतींमुळे साप आढळलेल्या ठिकाणी राहणारे रहिवासी साप चावेल या भितीने मारुन टाकतात. त्यामुळे, सापांचं प्रमाण ही कमी होत चाललं आहे. पण, सापांच्या विषामुळे अनेक लसी तयार केल्या जातात. सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागते. पण, तो साप कोणत्या प्रजातीचा आहे किंवा तो किती विषारी आहे? तो कुठल्या स्थळी राहतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तात्काळ मिळत नाही.

दरम्यानच्या, काळात आसाममध्ये एक आफ्रिकन प्रजाती साप तिथल्या वनाधिकाऱ्यांना आढळून आला होता. ही भारतीय प्रजात नसल्याचे समजल्यावर हा साप गैरमार्गाने आसामच्या जंगलात पोहचला का? यावर काम सुरू झाले. पण, यावर सावध होऊन सापांच्या भौगोलिक स्थिती टिपण्यासाठी टॅग बसवण्याचे विचाराधीन असल्याची माहिती हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेच्या संचालिका (अतिरिक्त भार) डॉ. निशिगंधा नाईक यांनी दिली आहे.

- Advertisement -

…यामुळे सापाची वास्तव्याची माहिती घेणं सोपं होईल

सापाचं विष काढल्यानंतर साप सुखरुप जंगलात सोडला जातो. पण, त्याच सापाला टॅग लावल्यास तो कुठल्या भागात सोडला गेला याची नोंद ठेवता येईल. शिवाय, त्या टॅगमुळे त्याच्या वास्तव्याची माहिती ही घेण्यास सोपं होईल, असं ही डॉ. नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

पश्चिम घाटात जैविक विविधता कमी होत असल्याची चिंता

जेवढी जीवसृष्टीची विविधता तेवढं सर्प वास्तव्य अधिक किंवा त्याच्या प्रजाती अधिक आहे. पण, ही माहितीच उपलब्ध नसल्याचंही सांगण्यात आलं. विशिष्ट भौगोलिक स्थितीत आढळणारा फुरसे हा एकमेव सरपटणारा प्रकार कोकणातील देवगड तालुक्यात अधिक प्रमाणात आढळतो. पण, हीच प्रजाती गुजरात राज्यातही आढळून येण्याची माहिती नजीकच्या काळात मिळाली होती. भौगोलिक ठिकाणी कोणत्या सर्पाच्या प्रजाती आढळून येतात? यावर सध्या अभ्यास सुरू आहे. पण, ही माहिती सार्वत्रिक उपलब्ध नाही. दरम्यान, महाराष्ट्र ते गुजरात दांगपासून कर्नाटक, तामिळनाडू केरळ पर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटात जैविक विविधता कमी होत असल्याची चिंता नॅशनल इन्स्टिट्युट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संस्थेचे माजी संचालक डॉ. संजीवा खोलकुटे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना हाफकिन संस्थेच्या संचालिका (अतिरिक्त भार) डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितलं की, “टॅगमुळे सर्पांच्या हालचाली टिपणे सहज सोपं होणार आहे. जसं बिबट्यांच्या शरीरात चीप बसवण्यात आल्या आहेत. तसंच, स्थलांतरीत पक्ष्यांच्या पायात रिंग अडकवल्यामुळे त्यांचा अभ्यासही सोपा झाला आहे. सापांवर कोणत्या आणि कशा प्रकारे टॅग लावले जातील याचा विचार सुरू आहे. सापाची त्वचा नाजूक असते. किंवा सापाची छोटी सर्जरी करून त्यात चीप सारखा प्रकार बसवता येऊ शकतो का? यावरही विचार सुरू आहे. शिवाय, त्यासाठी मंजुरीही मिळणं ही आवश्यक आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -