घरमहाराष्ट्र...म्हणून महाराष्ट्रातले नेते उद्या कर्नाटकात जाणार नाहीत, फडणवीसांनी केलं स्पष्ट

…म्हणून महाराष्ट्रातले नेते उद्या कर्नाटकात जाणार नाहीत, फडणवीसांनी केलं स्पष्ट

Subscribe

मुंबई – महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई मंगळवारी कर्नाटकात जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा तुर्तास दौरा रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण चिघळत असल्याने हा दौरा रद्द केला जात असल्याचं बोललं जात होतं. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा रद्द होण्यामागचे खरे कारण आज माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रातील मंत्री महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्नाटकात जाणार होते. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या सीमावाद आहे. अशावेळी तेथील संभाव्य वाद टाळावा याकरता दौरा रद्द होऊ शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : राज्यातील मंत्र्यांचा दौरा तूर्तास स्थगित

- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक राज्य निर्णय घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालायच याबाबत निर्णय घेईल. त्यामुळे विनाकारण नव्याने वाद तयार करणे योग्य नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने केस मांडली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेलच. मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होता. एका कार्यक्रमानिमित्त तिथे जाणार होते. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद निर्माण करायचा का म्हणून यासंदर्भात विचार करतो आहोत. प्राथमिक मत असं आहे की महापरिनिर्वाण दिनी आंदोलन व्हावं, चुकीची घटना व्हावी, असं होऊ नये. अशा घटना टाळण्यासाठी दौऱ्याबाबत विचार सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमली आहे. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा समावेश आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केले होते. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असे आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -