घरमहाराष्ट्रअपंग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांसाठी 'न्यायाची गुढी'

अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांसाठी ‘न्यायाची गुढी’

Subscribe

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अपंग ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाण्यात पहिलं विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाण्यात पहिलं विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे. जिल्हा न्यायाधीश-३ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे यांचे जिल्हा न्यायालयात ही प्रकरणं चालवली जाणार आहेत. कल्याणमधील अपंग दाम्पत्य शंकर साळवे आणि संगीता साळवे यांनी न्यायासाठी ठाणे जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे दाद मागितली होती. गुढीपाडव्याच्या मुहर्तावरच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ही आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यामुळे आता अपंग ज्येष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांसाठी न्यायाची गुढी उभारली गेली आहे.

राज्यातील ११ ठिकाणी विशेष कोर्ट होणार स्थापन

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर अय्यर यांनी अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि समजातील दुर्लक्षित घटक यांच्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये याबाबत पत्रक काढले होते. ३ मार्च २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून राज्यात अकरा ठिकाणी अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटक यांच्यासाठी विशेष कोर्ट सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही न्यायालय स्थापन झाले नसल्याने कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे पाठपुरावा केला होता. राज्यातील ११ ठिकाणी विशेष कोर्ट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नगर, सातारा लातूर नागरपूर सांगली नाशिक आणि औरंगाबाद या अकरा शहरांचा समावश आहे. ठाण्यातील हे पहिलं न्यायालय स्थापन झाल्याचा दावा साळवे यांनी केला आहे. विशेष कोर्ट सुरू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींच्या खटले लवकरात लवकर निघण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा त्यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -
shankar salve
सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे

ठाण्याच्या कोर्टात केडीएमसीची पहिली केस

कल्याण डोंबिवली महापालिकेने दिव्यांगासाठी गाळे वाटप करताना केलेला भ्रष्टाचार आणि भेदभाव या विरोधात कल्याणचे साळवे दाम्पत्य गेल्या अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासनाबरोबर लढा देत आहेत. साळवे यांनी अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेऊन पालिका अधिकाऱ्यांवर दिव्यांग अॅट्रोसिटी अॅक्ट दाखल करण्याची मागणी केली होती.अपंग आयुक्तालयाने संबधित प्रकरण अपंगासाठीच्या विशेष न्यायालयात दाद मागण्याची सुचना केली होती. मात्र ठाणे जिल्हयात अपंग न्यायालय सुरू न झाल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे न्यायासाठी साकडं घातलं होतं. अखेर ठाण्यात अपंगासाठी विशेष न्यायालय स्थापन झाल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याच्या कोर्टात केडीएमसीची पहिली केस दाखल होणार आहे, असे साळवे यांनी सागितल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -